माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना नितीन गडकरींनी वाहिली श्रद्धांजली

  • 'माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस पक्षाचे नेते श्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. शिस्तप्रिय नेते म्हणून ओळख असलेल्या शिवाजीरावांचा जनसंपर्क दांडगा होता. निलंगा या त्यांच्या मतदारसंघात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहे. इश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो.' अशा शब्दांत नितीन गडकरींनी दु:ख व्यक्त केले आहेत.

मुंबई –  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं आज पहाटे किडनी विकारानं पुण्यात निधन झालं.  ते ९१ वर्षांचे होते. आज बुधवारी पहाटे २.१५ मिनिटांच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शोक व्यक्त केला आहे. 

‘माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस पक्षाचे नेते श्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. शिस्तप्रिय नेते म्हणून ओळख असलेल्या शिवाजीरावांचा जनसंपर्क दांडगा होता. निलंगा या त्यांच्या मतदारसंघात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहे. इश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो.’ अशा शब्दांत नितीन गडकरींनी दु:ख व्यक्त केले आहेत.   

आज दुपारी २ वाजेपर्यंत  शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे पार्थिव निलंगा येथे आणले जाणार असून सायंकाळी ६ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.शिवाजीराव पाटील-निलंगेकर १९८५ ते८६ दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपदही त्यांनी भूषवंलं आहे.