No access to local, but ST service also terminated

राज्य सरकारने अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये पाच स्तरावर अनलॉक करत असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार पाचव्या स्तरावर असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन तर दुसऱ्या स्तरावर असणाऱ्या जिल्ह्यात जवळपास ‘अनलॉक’ करण्याचा निर्णय झाला. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. मात्र तरीही मंुबईत तिसऱ्या स्तराच्या अनुषंगाने निर्बंध कायम आहेत. १५ जूनपासून लोकल प्रवासाची मूभा मिळण्याची आशा होती, परंतु, अद्यापही सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मूभा मिळालेली नाही. तर दुसरीकडे एसटीचीही सेवा समाप्त झाल्यामुळे मुंबईकरांना दुहेरी त्रास सहन करावा लागणार आहे.

    मुंबई : राज्य सरकारने अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये पाच स्तरावर अनलॉक करत असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार पाचव्या स्तरावर असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन तर दुसऱ्या स्तरावर असणाऱ्या जिल्ह्यात जवळपास ‘अनलॉक’ करण्याचा निर्णय झाला. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. मात्र तरीही मंुबईत तिसऱ्या स्तराच्या अनुषंगाने निर्बंध कायम आहेत. १५ जूनपासून लोकल प्रवासाची मूभा मिळण्याची आशा होती, परंतु, अद्यापही सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मूभा मिळालेली नाही. तर दुसरीकडे एसटीचीही सेवा समाप्त झाल्यामुळे मुंबईकरांना दुहेरी त्रास सहन करावा लागणार आहे.

    लॉकडाऊनमध्ये आधार ठरलेल्या बेस्ट सेवेवर आता पुन्हा ताण वाढला आहे. बेस्टच्या ताफ्यात मदतीला आलेल्या एसटीच्या एक हजार बसेस रविवारपासून बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोमवारपासून बेस्टसाठी गर्दी वाढल्याने बेस्टवर ताण आला आहे. लॉकडाऊनमध्ये मुंबईकरांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाच्या बसेस धावत होत्या. सोमवारपासून एसटीची सेवा समाप्त झाली. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांवर बेस्टमधून प्रचंड गर्दीत प्रवास करण्याची वेळ आली आहे.

    बेस्टच्या दिवसाला ३ हजार ११४ सेवा रस्त्यावर धावतात.
    बेस्टच्या परिवहन उपक्रमातील सुमारे ३ हजार बसताफ्यांच्या जोडीला एसटी महामंडळाकडून एक हजार बसचा ताफा सेवेत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्य़े सद्या सर्वसामान्यांसाठी लोकल बंद आहे. त्यामुळे बेस्ट ही एकमेव आधार ठरली आहे. निर्बंधांत शिथिलता आणली असल्याने सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यात अजूनही सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु झालेली नसल्याने बसचाच आधार घ्यावा लागतो आहे. मात्र महामंडळाने मुंबईकरांना नेमकी गरज असतानाच हा ताफा पुन्हा आपल्याकडे वळवून घेतला आहे. महामंडळाने रविवारी जाहीर केलेल्या निर्णयाचा पहिलाच फटका सोमवारी मुंबईकरांना बसला आहे.

    सोमवारी सकाळपासूनच शहरातील बऱ्याचशा बसथांब्यांवर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या मुंबईकरांची हतबलता दिसून येत होती. एसटीने त्यांच्या एसटीचा ताफा बेस्ट सेवेतून मागे घेतल्याने मुंबईकर प्रवाशांचे पुरते हाल सुरू झाले आहेत. निर्बंध शिथिलतेमध्ये कार्यालयात ५० टक्के उपस्थितीस अनुमती देण्यात आल्याने अनेकांना कार्यालयात जाण्यासाठी बेस्ट सेवेचा आधार आहे. पण, बेस्टच्या बसमधील सुमारे ३ हजार बसची संख्या वाढत्या प्रवाशांच्या तुलनेत अपुरी पडते आहे.

    गर्दीमुळे कोरोनाला निमंत्रण

    गेल्या आठवड्यात निर्बंध शिथिलतेमध्ये बेस्ट बसेस १०० टक्के क्षमतेने रस्त्यावर धावत आहेत. मात्र आता बेस्टच्या मदतीसाठी आलेला बेस्टचा ताफा बंद झाल्याने वाढत्या गर्दीचा भार बेस्टला पेलावा लागतो आहे. अप्ाुऱ्या बसेसमुळे यात प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतो आहे. यात वाढत्या गर्दीमध्ये कोरोनालाही निमंत्रण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

    एसटी सेवेच्या खर्चाचा भार महापालिकेने उचलला

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेस्टच्या मदतीसाठी गेल्यावर्षी एसटीचा ताफा बेस्टच्या ताफ्यात दाखल झाला. बेस्टच्या सहाय्यासाठी एक हजार बसची सेवा पुरवण्यात आली. त्यासाठी येणारा खर्च मुंबई पालिकेकडून दिला जात होता. त्यामुळे एसटी महामंडळास खर्चाचा भार सहन करावा लागत नव्हता. मात्र तरीही एसटी महामंडळाने सेवा बंद करण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

    खबरदारी म्हणून निर्बंध कायम

    राज्यासह मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना, ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारने नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्य सरकारने ठरवून दिलेल्या ५ स्तरांच्या नियमावलीत सोमवारपासून बदल झाला आहे. प्रत्येक आठवड्याला जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन नियमांत बदल केले जातील, असे प्रशासनाच्या वतीने आधीच सांगण्यात आले आहे. मुंबईतील कोरोना पॉझिटिव्हीटी दरही कमी आला आहे. मात्र तरीही खरबदारी म्हणून मुंबईतील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाही प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

    हे सुद्धा वाचा