maratha reservation

युक्तीवाद करण्यापासून दूर असलो तरी सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकावं म्हणून मी शर्थीचे प्रयत्न केले. याबाबत मी सर्व तयारी केली होती. असे कुंभकोणी म्हणाले.

मुंबई : मराठा आरक्षण (Maratha reservation) सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकजे वर्ग केले आहे. त्यामुळे राज्यात मराठा आरक्षणावरुन मराठा समाज (Maratha community) आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणावरुन माजी सरकारी वकिलांनी केलेल्या आरोपाचे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी स्पष्ट शब्दांत खंडन केले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारनं सांगितल्यामुळेच मी मी मराठा आरक्षणाच्या प्रकरणात न्यायालयात युक्तिवाद केला नाही. असा गौप्यस्फोट कुंभकोणी यांनी केला आहे.

महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी आरोप फेटळून लावला आहे. मराठा आरक्षण प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात फेब्रुवारी २०१९ मध्ये सुनावणी सुरु झाली होती. त्याआधी जानेवारी महिन्यात सोलापूर येथे मराठा संघटनांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सरकारने माजी महाधिवक्ता व्ही. ए. थोरात यांना युक्तीवाद करण्याची परवानगी द्यावी. अशी आग्रही मागणी मराठा संघटनांनी सरकारकडे केली होती. त्या विनंतीला मान देऊन खटल्यापासून दूर राहिलो. असे कुंभकोणी यांनी म्हटले आहे.

तसेच युक्तीवाद करण्यापासून दूर असलो तरी सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकावं म्हणून मी शर्थीचे प्रयत्न केले. याबाबत मी सर्व तयारी केली होती. असे कुंभकोणी म्हणाले.