ड्रग्ज प्रकरणात जामीन नाहीच; अरमान कोहलीचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला

अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी)ने अरमान कोहलीच्या मुंबईतील हाजी अली येथील घरावर छापा टाकून काही प्रमाणात ड्रग्स हस्तगत केला होता. त्यानंतर चौकशीअंती अरमान कोहलीला एनसीबीने अटक केली होती. अरमान कोहलीवर मादक द्रव्ये आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना विशेष एनडीपीएस न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर एनसीबी कोठडीत पाठवले होते. त्यानंतर अरमानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यातच अरमानने मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

    मुंबई : ड्रग्स प्रकऱणात अटकेत असलेला बॉलीवूड अभिनेता अरमान कोहलीचा (49) जामीन अर्ज शनिवारी मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अरमानला कोहलीला कोणताही दिलासा मिळाला नसून त्याचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

    अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी)ने अरमान कोहलीच्या मुंबईतील हाजी अली येथील घरावर छापा टाकून काही प्रमाणात ड्रग्स हस्तगत केला होता. त्यानंतर चौकशीअंती अरमान कोहलीला एनसीबीने अटक केली होती. अरमान कोहलीवर मादक द्रव्ये आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना विशेष एनडीपीएस न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर एनसीबी कोठडीत पाठवले होते. त्यानंतर अरमानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यातच अरमानने मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

    अवैधरित्या तस्करीला वित्तपुरवठा करणे आणि एनडीपीएस कायद्याच्या गुन्हेगारांना आश्रय देणे यासारख्या कडक गुन्ह्यांमध्ये आपला सहभाग दर्शविणारा कोणताही पुरावा एनसीबीकडे नसल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. त्यावर शनिवारी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर. एम. नेर्लीकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, त्याला विरोध करत या गुन्ह्यात सात आरोपी असून त्यांच्यामध्ये एक साखळी आहे.

    अरमानचे सहआरोपी यात पुरवठादार असून ते एकमेकांशी जोडलेले आहेत. पुरवठादारांनी, कोहलीला मोठ्या प्रमाणात औषधे पुरवली होती. असा दावा एनसीबीचे विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी केला. तसेच अरमानच्या आधीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची आठवणही त्यांनी न्यायालयाला करून दिली. त्याची दखल घेत न्यायालयाने अरमान कोहलीचा जामीन अर्ज फेटाळून लावत दिलासा देण्यास नकार दिला.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]