Mumbai Mayor kishori pendnaekar

पेंग्विनच्या सन २०२१ ते २०२४ या तीन वर्षांच्या देखभालीसाठी पालिकेने १५ कोटी २६ लाख रुपये खर्चाची निविदा मागवली होती. त्यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांनी पालिका प्रशासनावर जोरदार टीका सुरू केली. पेंग्विनच्या देखभालीसाठी ही निविदा अखेर रद्द करावी लागली. कोरोनाच्या संकटामुळे पालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पेंग्विनच्या वाढीव खर्चाच्या निविदेला प्रखर विरोध झाला.

    मुंबई : पेंग्विनच्या देखभालीसाठी सन २०१८ ते २०२१ या कालावधीसाठी दहा कोटी रुपये खर्च आला. 2017 च्या या निविदेत 10 टक्के वाढ सुचविण्यात आली होती, त्यानुसार निविदेच्या एकूण रकमेत वाढ करण्यात येणार आहे. त्या निविदेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत किंवा निविदा रद्द केलेली नाही अशी स्पष्ट भुमिका आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी मांडली.

    पेंग्विनच्या सन २०२१ ते २०२४ या तीन वर्षांच्या देखभालीसाठी पालिकेने १५ कोटी २६ लाख रुपये खर्चाची निविदा मागवली होती. त्यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांनी पालिका प्रशासनावर जोरदार टीका सुरू केली. पेंग्विनच्या देखभालीसाठी ही निविदा अखेर रद्द करावी लागली. कोरोनाच्या संकटामुळे पालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पेंग्विनच्या वाढीव खर्चाच्या निविदेला प्रखर विरोध झाला.

    पेंग्विनच्या देखभालीसाठी बाहेरीन कंत्राटदारांची नेमणूक करण्याची गरज नाही. पालिकेच्या अखत्यारीत पेंग्विनची देखभाल केली जाणार असून पालिकेचे डाॅक्टर पेंग्विनचे आरोग्य व्यवस्थापन करणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर विरोध मावळला.

    महापौर पेडणेकर यांनी आज आज पत्रकार परिषदेत पेंग्विनच्या देखभाल खर्चाबाबत भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की 2017 च्या निविदेतील तरतुदीनुसार खर्चात 10 टक्के वाढ करण्यात येणार आहे. निविदेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, किंवा निविदा रद्द करण्यात आलेली नाही.

    पेंग्विनमुले दरवर्षी 5 कोटी 67 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. पेंग्विनच्या देखभालीचा खर्च जवळपास तेवढाच आहे. मात्र पेंग्विन पर्यटकांचे आकर्षण झाले असून पेंग्विनमुळे प्राणिसंग्राहलयाचे उत्पन्न वाढले असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.