कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात थांबण्याची बंदी – केईएम रुग्णालयाचा निर्णय

मुंबई: कोरोनाविरोधातील लढाईमध्ये मुंबई महानगर पालिका मागील काही दिवसां पासून अनेक निर्णय घेत आहे, पण तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेला अपयश येत आहे.त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने

मुंबई: कोरोनाविरोधातील लढाईमध्ये मुंबई महानगर पालिका मागील काही दिवसां पासून अनेक निर्णय घेत आहे,  पण तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेला अपयश येत आहे.त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.  या निर्णयानुसार केईएम रुग्णालयातील गर्दी कमी करण्यासाठी याठिकाणी असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात थांबण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

राज्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ३३ हजार पार झाला आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टरांची संख्या वाढवण्यापासून ते रुग्णालयात बेड आणि आयसीयूची सुविधा वाढवण्यावर मुंबई महानगर पालिका विविध प्रयोग राबवीत आहे. यातच केईएम रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना येण्यास बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय आता महानगरपालिकेकडून घेण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईंकांना यापुढे फोनवरुन माहिती दिली जाणार आहे. 
यासंदर्भात केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की,  सध्या असे निदर्शनास येत आहे की, केईएम रुग्णालयात एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला उपचारासाठी दाखल केले तर त्याचे नातेवाईक सतत रुग्णालयात येतात. त्यामुळे रुग्णालयात फक्त गर्दी होत नाही तर कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना देखील कोरोनाची लागण होण्याची जास्त भीती असते. पुढील दोन दिवसानंतर हा नियम लागू होईल. संसर्ग रोखण्यासाठी हा  निर्णय घेण्यात आला आहे. तसेच  नातेवाईकांना रुग्णालयाकडून दररोज कमीत कमी एक फोन केला जाईल आणि त्यांना त्यांच्या रुग्णाच्या प्रकृतीची माहिती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.