मुंबईत ५० टक्के नागरिकांना कोरोनाचा धोका नाही ?

मुंबई: मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत आहे. कोरोना बळींची संख्याही वाढत आहे. असे चित्र असताना, कोरोनाच्या कचाट्यात येणाऱ्या ५० % रुग्णांना कोरोनामुळे कोणताही धोका नसल्याचे पालिका

मुंबई: मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत आहे. कोरोना बळींची संख्याही वाढत आहे. असे चित्र असताना, कोरोनाच्या कचाट्यात येणाऱ्या ५० % रुग्णांना कोरोनामुळे कोणताही धोका नसल्याचे पालिका आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. तर  कोरोना रुग्ण लवकर बरे होत आहेत, पण ज्या रुग्णांमध्ये लक्षण दिसून येत नाहियेत त्या रुग्णामुळे इतर लोकांना अप्रत्यक्षरित्या संसर्गाची लागण होण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

राज्यात कोरोना संकट गडद होत चालले आहे, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २१ हजारांच्या वर गेला आहे. यात ५१ टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. राज्य आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले की, मागील काही दिवसांत कोणतेही लक्षणे नसलेले रुग्ण आढळुन आले आहेत, हे रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. काही जणांमध्ये लक्षण दिसून आली नाहीत, तर ५ दिवसांमध्ये या रुग्णांच्या शरीरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी झाल्याचेही दिसून आला आहे. या रुग्णांमध्ये लक्षण नसल्याने या रुग्णांना कोणतेही औषध दिले जात नाही, तरीही या रुग्णांना विलगीकरण केले जाते, जेणेकरुन इतर लोकांना संसर्ग होऊ नये, असे डॉ. पाटील म्हणाल्या.

महाराष्ट्रातील आकडेवारी (१३ मे)

एकूण रुग्ण –  २०७६६

कोणतेही लक्षण नसलेले रुग्ण -१०५५१  

लक्षण आढळून आलेले रुग्ण -३७४१  

मृत्यू  – ८६६

ठीक  झालेले रुग्ण – ४७८६