त्रासातून सुटका नाहीच, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर जाण्याचा निर्णय हिताचा ठरेल

डाऊन धीम्या / अर्धजलद मार्गावर मुलुंड येथून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ दरम्यान सुटणाऱ्या सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविली जाईल व ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबून नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

  मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मुंबई विभागात आज विविध अभियांत्रिकी व देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  मेन मार्ग Main Line

  ठाणे-कल्याण अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.०० पर्यंत

  डाऊन धीम्या / अर्धजलद मार्गावर मुलुंड येथून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ दरम्यान सुटणाऱ्या सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविली जाईल व ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबून नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

  सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५१ दरम्यान कल्याण येथून सुटणारी अप धीम्या / अर्धजलद सेवा कल्याण व मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविल्या जातील व डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबून पुढे मुलुंड स्टेशनवर अप धीम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येऊन नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

  सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी / पोहोचणाऱ्या सर्व अप व डाऊन सेवा नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी सुटतील/ पोहोचतील.

  हार्बर मार्ग Harbour Line

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते संध्याकाळी ४.४० दरम्यान आणि चुनाभट्टी / वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० दरम्यान

  डाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ या कालावधीत वाशी / बेलापूर / पनवेलकरिता सेवा व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.०२ ते सायंकाळी ४.४३ दरम्यान वांद्रे / गोरेगावकडे जाण्याऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  अप हार्बर मार्गावर पनवेल / बेलापूर / वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी गोरेगाव / वांद्रे येथून सकाळी १०.१० ते सायंकाळी ४.५८ दरम्यान अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील.

  तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

  ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  पश्चिम मार्ग Western Line

  माहिम-अंधेरी (सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत)

  माहिम ते अंधेरी रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधी दरम्यान, मध्य रेल्वेकडे जाणार्‍या सर्व गोरेगाव गाड्या व हार्बर सेवा आणि काही चर्चगेट-गोरेगाव धीम्या मार्गावरील सेवा रद्द राहतील. या संदर्भात सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे.

  No escape from the hassle megablocks today on all three routes of the railway