No locals will run between Kurla-Vashi on Sunday; Megablock on Central and Harbor Railway

या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कुर्ला आणि वाशी-पनवेल दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.  हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी  ४.३० या वेळेत ट्रान्स हार्बर लाइन /मेन लाइन मार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई : रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (mega block) घेण्यात येणार आहे. ठाणे-कल्याण दरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर  सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत मेगाब्लॉक असमार आहे. तर, हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी दरम्यान अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत  मेगाब्लॉक असेल.

हार्बर रेल्वे (harbour railway)

कुर्ला-वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी  ४.१० दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. या दरम्यान  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ या वेळेत  सुटणाऱ्या बेलापूर / पनवेल / वाशीसाठीच्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

पनवेल / बेलापूर / वाशी येथून    सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ या वेळेत  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवाही रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कुर्ला आणि वाशी-पनवेल दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.  हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी  ४.३० या वेळेत ट्रान्स हार्बर लाइन /मेन लाइन मार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मध्य रेल्वे (central railway)

ठाणे-कल्याण अप  आणि डाउन  जलद मार्गावर हा  मेगाब्लॉक  असणार आहे. या ब्लॉकच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३७ ते दुपारी २.४८ पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील लोकल ठाणे  आणि कल्याण स्थानकांदरम्यान  डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या लोकल ठाणे ते कल्याण दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.

कल्याण येथून सकाळी १०.२६ ते दुपारी ३.१९ पर्यंत  सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या सेवा कल्याण ते ठाणे दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबून पुढे मुलुंड येथे अप जलद मार्गावर  वळविण्यात येणार आहेत.