उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेन याच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली. नुकतेच सत्र न्यायालयाने वाझे यांचे तीन अर्ज फेटाळून लावले होते.

    मुंबई : अंबानी घराबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरेन प्रकरणी अटक करण्यात आलेले आणि निलंबित गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली आहे.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेन याच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली. नुकतेच सत्र न्यायालयाने वाझे यांचे तीन अर्ज फेटाळून लावले होते.

    मात्र, त्यांना वकिलांना भेटू देण्याची मागणी मान्य करण्यात आली होती. तसेच त्यांच्या चौकशीदरम्यान वकिलांना तेथे हजर राहण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आता वाझे यांनी आता नव्याने अर्ज दाखल केला असून वकिलांशी बोलताना एनआयए अधिकाऱ्यांची उपस्थिती नको, अशी मागणी याचिकेतून कऱण्यात आली आहे. त्याची दखल घेत विशेष एनआयए न्यायालयाने एनआयएला आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत.