रात्रीची संचारबंदी करण्याचा अद्याप निर्णय झालेला नाही – वडेट्टीवार

पुन्हा टाळेबंदी होणार का? किंवा रात्रीची संचारबंदी लागू होणार का? यावर तर्क-वितर्क केले जात आहेत. परंतू राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रात्रीची संचारबंदीची शक्यता फेटाळून लावली आहे. तसेच नाईट कर्फ्यूचा निर्णय सुद्धा झालेला नाही. किंबहुना त्याची चर्चाच झाली नाही. तसेच रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

    मुंबई : या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा टाळेबंदी होणार का? किंवा रात्रीची संचारबंदी लागू होणार का? यावर तर्क-वितर्क केले जात आहेत. परंतू राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रात्रीची संचारबंदीची शक्यता फेटाळून लावली आहे. तसेच नाईट कर्फ्यूचा निर्णय सुद्धा झालेला नाही. किंबहुना त्याची चर्चाच झाली नाही. तसेच रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच कोरोनाची नियमावली जाहीर करणार आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

    तसेच शेतकऱ्यांना वाढीव मदत द्यायची की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं सुद्धा वडेट्टीवार यांनी माहिती दिली. राजू शेट्टी आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. सध्यातरी जिरायतीसाठी १३७० आणि बागायतीसाठी १८ हजार रुपये हेक्टर मदत एनडीआरएफच्या निकषानुसार देण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे सात लाख हेक्टरचं नुकसान झालं आहे. पंचनामे सुरू आहेत. अतिवृष्टी आणि नुकसानीबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. प्रति हेक्टर मदतीबाबत चर्चा झाली. सर्व विभागात समान मदतीवर चर्चा करण्यात आली. ऊस उत्पादकांना जास्त मदत देण्यावरही चर्चा करण्यात आली. याबाबत पुन्हा एकदा बैठक होणार आहे.

    दरम्यान,  वडेट्टीवार यांनी मीडियाशी बोलताना पडळकरांना इशारा दिला आहे. पडळकरांनी ऐकिव गोष्टीवर आरोप करू नये. वास्तव गोष्टींवर आरोप करावेत. आता ते कार्यकर्ते राहिले नाहीत. आमदार झाले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा. कोणत्या नातेवाईकाची आहे हे सांगावं. नाही सांगितलं तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन. असं वडेट्टीवार म्हणाले.

    अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना किती मदत द्यायची यावर चर्चा झाली. २०१९ मध्ये झालेल्या नुकसान पेक्षा कमी मदत आहे. एनडीआरएफचे निकष बदलण्याची गरज आहे. परत एक बैठक घेऊन एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत दिली जाईल, असं वडेट्टीवार म्हणाले.