नरेंद्र मोदींचे ‘असे’ इंडियन मॉडेल कोणीच स्वीकारणार नाही : नवाब मलिक

इंडियन मॉडेल झालेच पाहिजे परंतु हेच इंडियन मॉडेल असेल तर लोकांना यावर बोट ठेवण्याची संधी भाजप निर्माण करुन देतेय असेही नवाब मलिक म्हणाले. चांगली कामे करत राहिले पाहिजे. एखादं यश असेल किंवा काम झालं असेल तर निश्चितरुपाने लोकं प्रशंसा करतात.

    मुंबई : नदीमध्ये मृतदेह प्रवाहीत करणे, ऑक्सिजन अभावी लोकं मरत आहेत, औषधांचा तुटवडा आहे, देशात लस उपलब्ध नसताना लस देण्याचा कार्यक्रम जाहीर करणे हे इंडियन मॉडेल कोणीच स्वीकारणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदींच्या इंडियन मॉडेलचा समाचार घेतला आहे.

    इंडियन मॉडेल झालेच पाहिजे परंतु हेच इंडियन मॉडेल असेल तर लोकांना यावर बोट ठेवण्याची संधी भाजप निर्माण करुन देतेय असेही नवाब मलिक म्हणाले.

    चांगली कामे करत राहिले पाहिजे. एखादं यश असेल किंवा काम झालं असेल तर निश्चितरुपाने लोकं प्रशंसा करतात पण अपयशी ठरुनही आम्ही चांगलं काम करतोय असं भाजप बोलत राहिला तर लोकं स्वीकारणार नाहीत असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.