कर्तव्यात कसूर झाली तर खैर नाही, नांगरे-पाटलांचा पोलिसांना कडक इशारा

मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पोलिसांना आपलं कर्तव्य नीट बजावण्याच्या सूचना दिल्यात. अगदी साध्या कर्मचाऱ्यापासून ते मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत कुणीही कर्तव्यात कसूर करताना आढळला, तर त्याच्यावर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशाराच नांगरे-पाटील यांनी दिलाय. ऑर्केस्ट्रा, पब, बार, मसाज सेंटर, हुक्का पार्लर, कुंटणखाने, जुगार आणि दारूचे अड्डे यापैकी काहीही अवैध आणि बेकायदेशीर रित्या सुरू असल्याचं आढळलं, तर त्याच्याशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा नांगरे पाटलांनी दिलाय.

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्र पाठवून केलेल्या गौप्यस्फोटाचे परिणाम जसे महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले तसेच ते पोलीस दलातहप उमटताना दिसत आहेत. त्यामुळेच आता पोलीस दलातील वरिष्ठांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सावध आणि तत्पर राहण्याचा इशारावजा सल्ला दिलाय.

    मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पोलिसांना आपलं कर्तव्य नीट बजावण्याच्या सूचना दिल्यात. अगदी साध्या कर्मचाऱ्यापासून ते मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत कुणीही कर्तव्यात कसूर करताना आढळला, तर त्याच्यावर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशाराच नांगरे-पाटील यांनी दिलाय. ऑर्केस्ट्रा, पब, बार, मसाज सेंटर, हुक्का पार्लर, कुंटणखाने, जुगार आणि दारूचे अड्डे यापैकी काहीही अवैध आणि बेकायदेशीर रित्या सुरू असल्याचं आढळलं, तर त्याच्याशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा नांगरे पाटलांनी दिलाय.

    एखाद्या हॉटेल, बार किंवा कुठल्याही आस्थापनाच्या मालकांनी नियम पाळले नाहीत, तर त्यांच्यावर ताबडतोब कडक कारवाई व्हायलाच हवी, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. जर कुणी बेकायदेशीर कृत्यांना पाठिशी घालत असेल, तर त्या पोलिस कर्मचारी किंवा अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नांगरे पाटील यांनी दिलाय.

    अगोदर घडलेलं सचिन वाझे प्रकरण आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब यामुळे पोलीस दल हादरून गेल्याचं चित्र आहे. या सगळ्यात पोलीस दलाच्या प्रतिमेवरही डाग पडले आहेत. ते पुसून काढण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करताना दिसत आहेत.