गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, राष्ट्रवादीची ठाम भूमिका, आजच्या बैठकीकडे लक्ष

परमबीर सिंग यांच्यावर कारवाई केल्याच्या रागातून आलेली ही प्रतिक्रिया असल्यामुळे त्या पत्राकडे गांभिर्यानं पाहण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय. रागातून आलेली ही प्रतिक्रिया असल्यामुळे गृहमंत्र्यांना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

    मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडालीय. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आली असून गृहमंत्र्यांवर थेट आरोप झाल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीनं जोर धरलाय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं ही मागणी फेटाळून लावलीय.

    परमबीर सिंग यांच्यावर कारवाई केल्याच्या रागातून आलेली ही प्रतिक्रिया असल्यामुळे त्या पत्राकडे गांभिर्यानं पाहण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय. रागातून आलेली ही प्रतिक्रिया असल्यामुळे गृहमंत्र्यांना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या तरी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठिशी उभी असल्याचं स्पष्ट होतंय.

    दरम्यान, आज (रविवारी) संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडणार असून पक्षाच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांची हजेरी या बैठकीला असणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे लगेचच पक्षाकडून गृहमंत्र्यांवर काही कारवाई होईल, याची शक्यता धूसर आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार आता बैठकीत काय आदेश देतात आणि पुढील रणनिती काय ठरते, याकडं सर्वांचं लक्ष असेल.