कोणताही शिवसैनिक बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही : संजय राऊत

    मुंबई : सचिन वाझे यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. दरम्यांन परबांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. याचं पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राऊत म्हणाले की, महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरु आहे. अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर येत आहेत. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.

    दरम्यान यामध्ये अनिल परब यांचं, अजित पवार,आणि अनिल देशमुख यांचं नाव आलं आहे. गुन्हा केल्याने अटकेत असलेल्या आरोपीकडून जेलमध्ये लिहून घेतलं जातं आणि तो पुरावा म्हणून समोर आणलं जातं. हे राजकीय षडयंत्र आहे. मी अनिल परब यांना ओळखतो. अशा कामांत ते कधीच नसतात. कोणताही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही. काल त्यांनी शपथ घेऊन आरोप खोटे असल्याचं सांगितलं असून माझा त्यांच्यावर विश्वास आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

    सचिन वाझेंचा परब यांच्यावर गंभीर आरोप ?

    मंत्री परब यांनी ‘एसबीयुटी’च्या (सैफी बु-हाणी अप लिफ्टमेंट ट्रस्ट) विश्वास्तांविरोधात प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. ही चौकशी बंद करण्याच्या मोबदल्यात ५० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव विश्वास्तांसमोर ठेवण्यास सांगितले. महापालिकेच्या कंत्राटदारांविरोधात निनावी तक्रारीवर ‘सीआययूकडून चौकशी सुरू होती. परब यांनी यातील ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप वाझे यांनी या पत्रात केला आहे.