कुर्ला स्थानक ते कुर्ला सिग्नलपर्यंत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कुर्ला: लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणल्यानंतर मुंबईमधील नेहमी गर्दी असणाऱ्या ठिकाणांवर पुन्हा एकदा नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. कुर्ला पूर्वच्या एस जी बर्वे मार्गावर काही दिवसांपासून नागरिकांची

कुर्ला: लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणल्यानंतर मुंबईमधील नेहमी गर्दी असणाऱ्या ठिकाणांवर पुन्हा एकदा नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. कुर्ला पूर्वच्या एस जी बर्वे मार्गावर काही दिवसांपासून नागरिकांची पुन्हा एकदा गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे. या मार्गावर कुर्ला स्थानक ते पूर्व द्रुतगती महामार्ग या पट्ट्यात अनेक फेरीवाले, भाजी मंडई, मासळी बाजार तसेच किराणा मालाची दुकाने असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतु या गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना पाहायला मिळत आहे. नेहरूनगर, ठक्कर बाप्पा व शिवसृष्टी या परिसरातील नागरिक या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात. या परिसरांमध्ये कोरोनाचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या गर्दीत कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांमार्फत देखील गर्दी करणाऱ्या नागरिकांना सुरक्षित अंतर करण्याचे आवाहन केले जात आहे.