
काेराेनाने मागील काही महिन्यांपासून थैमान घातले आहे. आता प्रत्येकजण काेराेना लसीची आतुरतेने वाट पाहत आहे. असे चित्र असताना, मुंबईत सुरु असलेल्या स्वदेशी काेराेना वैक्सीनसाठी स्वयंसेवकांचे असलेले ‘आव्हान’ पूर्ण करता-करता आराेग्य विभागाच्या नाकी नऊ येत आहेत. वैक्सीनच्या चाचणीसाठी आराेग्य विभागाला स्वयंसेवक मिळत नसल्याने आराेग्य विभागाची चिंता वाढत आहे. वैक्सीनसाठी आराेग्य विभागाची ताेकडी जनजागृती व लाॅकडाऊन, प्रवासाची अपुरी साधने यामुळे स्वयंसेवक उपलब्ध हाेत नसल्याने आराेग्य विभागासमाेर एक नवं आव्हानं उभ ठाकलं आहे.
- आव्हानं पूर्ण करण्यासाठी आराेग्य विभागाची युध्दपातळीवर धडपड; पण जनजागृतीची कमतरता
नीता परब
मुंबई (Mumbai). काेराेनाने मागील काही महिन्यांपासून थैमान घातले आहे. आता प्रत्येकजण काेराेना लसीची आतुरतेने वाट पाहत आहे. असे चित्र असताना, मुंबईत सुरु असलेल्या स्वदेशी काेराेना वैक्सीनसाठी स्वयंसेवकांचे असलेले ‘आव्हान’ पूर्ण करता-करता आराेग्य विभागाच्या नाकी नऊ येत आहेत. वैक्सीनच्या चाचणीसाठी आराेग्य विभागाला स्वयंसेवक मिळत नसल्याने आराेग्य विभागाची चिंता वाढत आहे. वैक्सीनसाठी आराेग्य विभागाची ताेकडी जनजागृती व लाॅकडाऊन, प्रवासाची अपुरी साधने यामुळे स्वयंसेवक उपलब्ध हाेत नसल्याने आराेग्य विभागासमाेर एक नवं आव्हानं उभ ठाकलं आहे.
मुंबईतील राज्य सरकारच्या जे.जे. व पालिकेच्या सायन रुग्णालयात भारत बायाेटेक द्वारा निर्मित ‘काे-वैक्सीन’’ची चाचणी सुरु आहे. ईसीएमआरच्या निर्देशानुसार, सायन व जे.जे. या रुग्णालयात येत्या ३१ डिसेंबरपर्यंत एक हजार स्वयंसेवक वैक्सीनच्या चाचणीकरीता उपलब्ध हाेणे आवश्यक आहे; परंतु स्वयंसेवकांचे आव्हान पूर्ण हाेण्यास काही दिवसच शिल्लक आहेत, असे असताना स्वयंसेवक कुठुन आणायचे असा प्रश्न आराेग्य विभागासमाेर उभा ठाकला आहे. दाेन्ही रुग्णालयात अजूनही ६०० पेक्षाही अधिक स्वयंसेवकांची गरज आहे. पण हे आव्हान पूर्ण कसे करायचे असा प्रश्न आराेग्य विभागाला भेडसावत आहेत. अपुरी जनजागृती व दळण-वळणाचा अभावामुळे स्वयंसेवक मिळत नसल्याचे वरिष्ठ डाॅक्टर खासगीत सांगतात.
जे.जे. रुग्णालयात आतापर्यंत ३९९ स्वयंसेवकांची तपासणी झाली असून यात ३५० स्वयंसेवक चाचणीसाठी नाव नाेंदणी करण्यात आली आहे. जे. जे. रुग्णालयाचे समन्वयक डाॅ. दिनेश धाेडी यांनी सांगितले की, जे.जे. रुग्णालयात ३९९ स्वयंसेवकांपैकी ३६८ स्वयंसेवक वैक्सीनच्या परीक्षणात पात्र ठरले आ हेत. सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. माेहन जाेशी यांनी सांिगतले की, स्वयंसेवकांचे आ व्हान पूर्ण करण्यासाठी अजून ६५० स्वयंसेवकांची आवश्यकता आहे.
डाॅ. धाेडी यांनी सांगितले की, काेराेनाबाबत मागील अनेक महिन्यांपासून नागरिकांमध्ये असलेली भीती, संभ्रम याशिवाय रुग्णालयापर्यंत पाेहचण्यास दळण-वळणाची अपुरी साधने, वैक्सीन चाचणीच्या प्रक्रियेसाठी हाेणारा विलंब यामुळे स्वयंसेवक मिळत नसल्याचे डाॅ. धाेडी सांगतात. वैक्सीन चाचणीबाबत जनजागृती सुरु असून तळागळात पाेहचण्याचा आमचा प्रयत्न युध्दपातळीवर करत आहे, यामुळे नक्कीच स्वयंसेवक मिळतील असे आम्हांला वाटते.