अनिल देशमुखांविरोधात अजामीनपात्र अटकवॉंरट! चौकशीला तीनवेळा पाठ, ईडी कारवाई करणार 

देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर अद्याप सुनावणी झाली नाही. त्यामुळे त्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई करावी, असे ईडीच्या अधिकाऱ्यांचे मत झाले असल्याचे समजते. कारवाईबाबत तांत्रिक व न्यायालयीन बाबींची पूर्तता केली जात आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.

    मुंबई : सतत तीन वेळा ईडीच्या चौकशील पाठ दाखविणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडी कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ईडीच्या अटकेपासून स्वत:चाव बचाव करण्यासाठी देशमुख यांनी तीनवेळा विविध कारणे समोर करून चौकशी टाळली तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात धावही घेतली. चौकशी टाळल्यामुळे ईडी आता लवकरच त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढणार असल्याची चर्चा असून याबाबत कायदेशीर बाबींची पूर्तताही केली जात असल्याची माहिती सूत्राने दिली.

    मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने प्राथमिक तपास करून अहवाल सादर केला होता. अहवालच्या आधारेच ईडीने देशमुख यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्यांच्या घरी छापे टाकून खासगी सचिव संजीव पालांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक केली.

    देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर अद्याप सुनावणी झाली नाही. त्यामुळे त्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई करावी, असे ईडीच्या अधिकाऱ्यांचे मत झाले असल्याचे समजते. कारवाईबाबत तांत्रिक व न्यायालयीन बाबींची पूर्तता केली जात आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.

    मुलगाही गैरहजर

    देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीने मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. मात्र, त्यांनीही चौकशीला पाठ फिरविल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये स्वतःसह कुटुंबातील सदस्यांनाही ईडीच्या कठोर कारवाईपासून संरक्षण मागितले आहे. त्यामुळे ऋषिकेश हे चौकशीसाठी गैरहजर राहिले असल्याची चर्चा आहे.