Rs 1.5 lakh ransom demanded from company owner; Handcuffed four clean up marshals of the municipality

मार्शलच्या गैरवर्तणुकींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापौरांनी मार्शल सेवेत असताना गणवेश सक्तीचा असावा. गणवेशावरील कोटच्या पुढे आणि मागे संबंधित मार्शलची ओळख दर्शविणारा क्रमांक यासह विविध प्रकारची माहिती असावी अशा सूचना मार्शलच्या एजन्सीना दिल्या होत्या. मुंबईत हजारो मार्शल असल्याने नवे कोट तयार करण्यासाठी एजन्सीनी पालिकेकडून मुदत मागून घेतली होती. या नव्या कोटवर महापौरांनी शिक्कामोर्तब केले आहे.

  मुंबई – कामावर असताना साध्या कपड्यांत कारवाई करणे, दंड वसुली न करता ‘चिरीमिरी’ घेणे, नागरिकांना धमकावणे अशा तक्रारी क्निअप मार्शल विरोधात केल्या जात आहेत. या गैरवर्तणुकीला चाप लावण्यासाठी मुंबई महापालिकेने पावले उचलली आहेत. ड्युटीवर असताना क्लिनअप मार्शलला गणवेश सक्तीचा असून कोटच्या दोन्ही बाजूला पालिकेचा विभाग, मार्शल व कंत्राटदार एजन्सीचे नाव, क्रमांक लिहिणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसे कोट एजन्सीकडून बनवून घेण्यात आले आहेत. या नियमावलीची लवकरच अमलबजावणी केली जाणार आहे.

  मुंबईत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-या तसेच मास्कविना बेजबाबदारपणे फिरणा-या नागरिकांविरोधात कारवाई करण्यासाठी पालिकेने घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार क्लीनअप मार्शल नियुक्त केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, नैसर्गिक विधी, अस्वच्छता, मास्क न लावणे यासह विविध प्रकारच्या बाबींवर कारवाई करण्याचे अधिकार मार्शलना देण्यात आले आहेत.

  कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना काळात मास्कविना फिरणा-या नागरिकांवर वचक ठेवण्यासाठी मार्शलच्या कारवाईला गती देण्यात आली आहे. मात्र कारवाई सुरू झाल्यानंतर मागील दोन वर्षात क्लिनअप मार्शल विरोधात गैरवर्तणूक केल्याच्या तक्रारी नागरिकांनी पालिकेकडे केल्या आहेत. नागरिक व मार्शलमध्ये खटके उडत आहेत. याची गंभीर दखल घेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घनकचरा खात्याचे संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि क्लीनअप मार्शल एजन्सी यांची एक बैठक मागील महिन्यात घेतली होती.

  मार्शलच्या गैरवर्तणुकींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापौरांनी मार्शल सेवेत असताना गणवेश सक्तीचा असावा. गणवेशावरील कोटच्या पुढे आणि मागे संबंधित मार्शलची ओळख दर्शविणारा क्रमांक यासह विविध प्रकारची माहिती असावी अशा सूचना मार्शलच्या एजन्सीना दिल्या होत्या. मुंबईत हजारो मार्शल असल्याने नवे कोट तयार करण्यासाठी एजन्सीनी पालिकेकडून मुदत मागून घेतली होती. या नव्या कोटवर महापौरांनी शिक्कामोर्तब केले आहे.

  गणवेश सक्तीमुळे क्लीनअप मार्शलची ठळक ओळख सर्वांना समजेल. तसेच बोगस क्लीनअप मार्शल असेल तर त्यांचा शोध घेणे शक्य होईल. पालिकेच्या कायद्यानुसार करण्यात येणारी दंडात्मक कारवाईत दुर्लक्ष केल्यास मार्शल व त्याच्या एजन्सीवर कारवाई करण्यात येईल असे महापौरांनी सांगितले.

  दीड वर्षात ३२ लाख नागरिकांवर कारवाई –

  सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणा-य़ांवर गेल्या दीड वर्षात ३२ लाख ९ हजार २५६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात ६४ कोटी ५७ लाख ५३ हजार ४०० रुपये दंड वसूल केला असल्याची माहिती घनकचरा विभागातर्फे देण्यात आली आहे.

  गणवेशामुळे क्लिनअप मार्शल ओळखणे सोपे –

  गणवेश सक्ती आणि कोटवरील नाव, विभाग, क्रमांकामुळे मुंबईकरांना क्लीनअप मार्शल ओळखणे सोपे होणार आहे. मार्शल दंडाव्यतिरिक्त पैशांची मागणी करत असेल तर पुराव्यांसह तक्रार केल्यास अशा मार्शलवर निय़मानुसार कारवाई केली जाईल.

  किशोरी पेडणेकर, महापौर मुंबई