नॉन कोविड रुग्णालये पावसाळी साथ  व इतर रुग्णांसाठी,पालिका रुग्णालये सज्ज

मुंबई: मुंबईत मागील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळला , शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरीही येणाऱ्या काही दिवसात कोरोना बरोबर मुंबईकराना डेंगू, मलेरिया, साथीचा ताप, अशा साथी च्या आजारांचा

मुंबई: मुंबईत मागील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळला , शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरीही येणाऱ्या काही दिवसात कोरोना बरोबर मुंबईकराना डेंगू, मलेरिया, साथीचा  ताप, अशा साथी च्या आजारांचा सामना करावा लागणार आहे.ज्यामुळे मुंबईकरांचा धोका आणखी वाढला आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग आणि दुसरीकडे पावसाळयात पसरणारे साथीचे आजार यामुळे पालिका रुग्णालयांवरील भार आणि जबाबदारी अजून वाढणार आहेत. 

या सर्व जबाबदारीना गांभीर्याने घेत पालिकेच्या आरोग्य विभागाने महत्वाची बैठक घेऊन पावसाळया दरम्यान येणाऱ्या आजारांसाठी वेगळी रुग्णालये देण्याचा निर्णय घेतला आहे.शिवाय, जी रुग्णालये नॉन कोविड आहेत आणि जिथे रुग्णांचा वावर कमी असेल अशी रुग्णालये पावसाळी आजारांसाठी आणि इतर रुग्णांसाठी सज्ज केली जाणार आहेत. 

शिवाय अशा ही काही रुग्णालये शोधली जात आहेत जे पावसाळी आजारांसाठी आरक्षित राहील.येत्या काही दिवसात पावसासोबत येणाऱ्या साथीच्या आजारांसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. पावसाळी आजारांबाबत नुकतीच एक बैठक झाली. ज्यात पावसाळी आजारांसाठी वेगळं रुग्णालय आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिथे जास्त बेडस ची सुविधा असेल आणि ते आजारांसाठी वापरले जाऊ शकेल अशा रुग्णालयाची निवड करण्यात येत आहे.

नॉन कोविड रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालये ही पावसाळी आजारांसाठी देण्यात येणार आहेत. गरजेनुसार रुग्णालयांबाबत निर्णय घेतला जाईल, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले

दरम्यान, केईएम आणि सायन मधील जे नॉन कोविड विभाग असतील तिथलेच रिकामी बेडस पावसाळी आजारांसाठी दिले जातील.शिवाय आणखी दोन ते तीन रुग्णालयांच्या शोधात आहोत. तसंच, पावसाळयासाठी तयारी सुरू झाली आहे. नॉन कोविड बेडस ची उपलब्धता करुन दिले जाणार आहेत. १६ रुग्णालये आहेत त्यापैकी फक्त 4 रुग्णालये कोविडसाठी देण्यात आली आहेत, असे सांगण्यात आले.सध्या नायर हे रुग्णालय पुर्णपणे कोविड साठी देण्यात आले आहे. त्यातच केईएम आणि सायन मधिल काही बेडस राखीव ठेवण्यात आले आहे. अश्यातच पावसाळी आजारांसाठी जास्तीत जास्त उप नगरीय  रुग्णालयांचा वापर केला जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.