Jewels that have not been hallmarked should not be cracked down on until then; High Court directs Central Government

दागिने हॉलमार्क प्रमाणित करण्याचे बंधन मात्र सुवर्णकारांवर असेल. त्यामुळे जुन्या दागिन्यांवरून काळजीत पडलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हॉलमार्क दागिन्यांसंदर्भातील निर्णय केंद्र सरकारने नुकताच जाहीर केला. त्याची अंमलबजावणी 15 जूनपासून सुरू झाली. अर्थात यासंदर्भात सुवर्ण व्यावसायिकांना वेळ मिळावा म्हणून असे व्यवहार न करणाऱ्यांना ऑगस्टअखेरपर्यंत कसलाही दंड होणार नाही, असेही सध्या ठरविले आहे.

    मुंबई : सरकारने सोन्याचे दागिने हॉलमार्क प्रमाणित असणे बंधनकारक केले आहे. यामुळे बिगर हॉलमार्क दागिने विकायचे कसे?, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. यावर भारतीय मानक संस्थेने (बीएसआय) स्पष्टीकरण दिले आहे. बिगर हॉलमार्क दागिने व्यावसायिकांकडे जाऊन विकता येतील.

    असे दागिने हॉलमार्क प्रमाणित करण्याचे बंधन मात्र सुवर्णकारांवर असेल. त्यामुळे जुन्या दागिन्यांवरून काळजीत पडलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हॉलमार्क दागिन्यांसंदर्भातील निर्णय केंद्र सरकारने नुकताच जाहीर केला. त्याची अंमलबजावणी 15 जूनपासून सुरू झाली. अर्थात यासंदर्भात सुवर्ण व्यावसायिकांना वेळ मिळावा म्हणून असे व्यवहार न करणाऱ्यांना ऑगस्टअखेरपर्यंत कसलाही दंड होणार नाही, असेही सध्या ठरविले आहे.

    बीएसआयचे महासंचालक प्रमोदकुमार तिवारी यांनी नुकतीच ही घोषणा केली. नागरिक आपल्या घरातील सोन्याचे जुने दागिने सुवर्णकारांना विकू शकतात. नंतर त्याचे रूपांतर हॉलमार्क दागिन्यांमध्ये करणे (आहे त्याच स्थितीत किंवा नवा दागिना घडवून) ही सुवर्णकारांची जबाबदारी राहील.