Congress will leave Thackeray government

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. महाराष्ट्रात राज्य कारभार चालवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र आहेत. पण 2024 सालची विधानसभा आणि लोकसभा निवडणूक आघाडी करून एकत्र लढवण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले. पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरेल, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी हे विधान केले.

    मुंबई : नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. महाराष्ट्रात राज्य कारभार चालवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र आहेत. पण 2024 सालची विधानसभा आणि लोकसभा निवडणूक आघाडी करून एकत्र लढवण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले. पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरेल, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी हे विधान केले.

    2019 विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आकाराला आले. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सहभागी आहेत. किमान समान कार्यक्रमाच्या धोरणावर महा विकास आघाडी सरकार आकाराला आले असून त्यांनी लोकहिताचे अनेक निर्णय घेतले असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

    शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी निर्णय असो किंवा कोविड व्यवस्थापन, सामान्य नागरिक सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहे असा दावा नवाब मलिक यांनी केला. पुढची निवडणूक आम्ही स्वतंत्रपणे लढवू असे पटोले म्हणाले. संघटनात्मक बांधणी भक्कम करण्याबरोबरच कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी सर्वच पक्षांना काम करावे लागते. असे मलिक यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तिन्ही पक्ष एकत्र किंवा स्वतंत्रपणे लढवतील. तीन पैकी दोन पक्षांमध्ये आघाडी होऊ शकते. परिस्थितीनुसार या संदर्भात निर्णय घेतले जातील, असे मलिक यांनी सांगितले.

    हे सुद्धा वाचा