धारावीत आठवड्याभरात एकही मृत्यू नाही – रुग्णवाढही नियंत्रणात, आज फक्त १० रुग्णांची नोंद

मुंबई : धारावीतील रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून नियंत्रणात येत असून आज केवळ १० नवीन रुग्णांची नोंद झाली. धारावीतील रुग्णसंख्या १८९९ वर पोहोचली आहे. तर धारावीत गेल्या आठवड्याभरात एकाही

 मुंबई : धारावीतील रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून नियंत्रणात येत असून आज केवळ १० नवीन रुग्णांची नोंद झाली. धारावीतील रुग्णसंख्या १८९९ वर पोहोचली आहे. तर धारावीत गेल्या आठवड्याभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आल्याचे दिसुन येत आहे. आज धारावीत १० नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या १८९९ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ७१ वर माहीम मध्ये आज १८ नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या ६२४ इतकी झाली आहे.तर मृतांचा आकडा ९ इतका आहे. तर दादरमध्ये आज १० नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या ही ३८४ इतकी झाली आहे. तर आजपर्यंत १२ मृत्यू झाले आहेत. धारावीसह दादर आणि माहीम मधील परिस्थिती देखील नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. जी उत्तर विभागात आज दिवसभरात ३८  नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या २९०७ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा ९० इतका आहे.