वैद्यकीय शिक्षकांचे निवृत्ती वय ६२ वर्षांहून अधिक वाढविण्यास विरोध; महापालिकेतील डॉक्टरांनी दिलाय संपाचा इशारा

वैद्यकीय शिक्षकांचे निवृत्तीचे वय ६२ वर्षाहून अधिक वाढवण्याच्या हालचाली प्रशासनाच्या आहेत. या पार्श्वभूमीवर केईएममध्ये आयोजित केलेल्या सर्व अध्यापक संघटनाच्या एकत्रित सभेत याला तीव्र विरोध करण्यात आला आहे. तसे झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा ठराव करण्यात आला आहे.

    मुंबई : मुंबई महापालिका वैद्यकीय प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षाहून अधिक वाढवण्याचा विचार पालिका प्रशासनाकडून केला जातो आहे. याला पालिकेतील डॉक्टरांनी तीव्र विरोध केला असून तसा निर्णय झाल्यास डॉक्टर संपावर जातील असा इशारा प्रशासनाला दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त, स्थायी समिती व आरोग्य समिती अध्यक्षांना दिले आहे.

    वैद्यकीय शिक्षकांचे निवृत्तीचे वय ६२ वर्षाहून अधिक वाढवण्याच्या हालचाली प्रशासनाच्या आहेत. या पार्श्वभूमीवर केईएममध्ये आयोजित केलेल्या सर्व अध्यापक संघटनाच्या एकत्रित सभेत याला तीव्र विरोध करण्यात आला आहे. तसे झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा ठराव करण्यात आला आहे. कनिष्ठ प्राध्यापकांची सहाय्यक प्राध्यापक पदावर वर्षानुवर्षे होणारी पदोन्नतीवंचना टाळण्यासाठी सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षांच्या पुढे न वाढविण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला आहे.

    कनिष्ठ प्राध्यापकांच्या वर्षानुवर्षे पदोन्नती रखडल्यामुळे प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६२ वर्षांपलीकडे वाढण्यास तीव्र विरोध करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. तसा निर्णय प्रशासनाने घेतल्यास सर्व डॉक्टर संपावर जातील असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.