मुंबईत रिक्षा, टॅक्सीचं भाडं वाढवाच नाही तर… भाजप नेत्याचा ठाकरे सरकारला गंभीर इशारा

भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांनी रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे (Taxi fare) वाढवण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास २५  डिसेंबरला मातोश्रीसमोर चक्का जाम आंदोलन करु, असा इशारा शेख यांनी दिला आहे.

मुंबई  :  २२ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत मुंबईतील टॅक्सी, रिक्षांची भाडेवाढी बाबात निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच मुंबईत ऑटो, टॅक्सीच्या भाडे वाढीवरुन चांगलच राजकारण सुरु झाले आहे. भाजपचे नेते रिक्षा, टॅक्सी चालकांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. मुंबईत रिक्षा, टॅक्सीचं भाडं झालीच पाहिजे अशी भूमिका घेत भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारला  गंभीर इशारा दिला आहे.

भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांनी रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे (Taxi fare) वाढवण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास २५  डिसेंबरला मातोश्रीसमोर चक्का जाम आंदोलन करु, असा इशारा शेख यांनी दिला आहे.

दरम्यान, कोरोना काळात प्रत्येकाची स्थिती हलाकीची झाली आहे. त्यामुळे दरवाढ करणे हा मार्ग योग्य नाही. रिक्षाचालकांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी १० हजार रुपये महिना देण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. मात्र ही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत २ ते ३ रुपये वाढविणे योग्य नाही, असं शशांक राव (अध्यक्ष, मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियन)यांनी सांगितलं.

तर, २२ डिसेंबर रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीसंदर्भात चर्चा होणार आहे.त्यानंतर भाडेवाढ होणार की नाही, हे ठरणार आहे असं परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी स्पष्ट केलं.