अंबानी स्फोटक प्रकरणात फक्त सचिन वाझेचाच हात नाही तर… एनआयएने केला आणखी एक धक्कादायक दावा

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण आणि त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणाचा तपास एनआयएकडून केला जात आहे. या प्रकरणी मुंबई पोलिस दलातील सचिन वाझे, रियाझ काझी आणि सुनील माने या तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. सुनील माने याला अटक केल्यानंतर त्यानेच मनसुखच्या हत्येच्या दिवशी त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला, असा दावा एनआयएने केला. त्यासोबतच अंबानी स्फोटक प्रकरणात केवळ सचिन वाझेचाच हात नसून त्यासोबत आणखी एका पोलिसाला याबद्दलची माहिती असल्याची माहिती होती, असा दावा करण्यात येत आहे.

    मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण आणि त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणाचा तपास एनआयएकडून केला जात आहे. या प्रकरणी मुंबई पोलिस दलातील सचिन वाझे, रियाझ काझी आणि सुनील माने या तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. सुनील माने याला अटक केल्यानंतर त्यानेच मनसुखच्या हत्येच्या दिवशी त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला, असा दावा एनआयएने केला. त्यासोबतच अंबानी स्फोटक प्रकरणात केवळ सचिन वाझेचाच हात नसून त्यासोबत आणखी एका पोलिसाला याबद्दलची माहिती असल्याची माहिती होती, असा दावा करण्यात येत आहे.

    या प्रकरणात एनआयएच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले. मुंबई पोलिस दलातील निलंबित अधिकारी सुनील माने यांच्या मोबाईलमधून काही पुरावे एनआयने हस्तगत केले. मनसुखची गाडी ठेवण्यासाठी जो मार्ग ठरवण्यात आला होता, त्याचा नकाशा मानेच्या मोबाईलमध्ये असल्याचे दिसून आल्याची माहिती मिळाली.

    पण, महत्त्वाचे म्हणजे मनसुख हिरेन हत्येसोबतच अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवली जाणार आहेत या प्लॅनची कल्पनादेखील वाझेसह मानेलाही होती असे सांगितले जाते. याशिवाय, सुनील माने याने मोबाइलमधून काही महत्त्वाचे पुरावे डिलीट केल्याचा संशयही एनआयएला आहे.