Eknath Khadse's apology; He had made a controversial statement about Brahmins while criticizing Fadnavis

मुंबई :  राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधताच एकनाथ खडसे यांच्या मागे ईडीची टिकटिक सुरु झाली आहे. खडसे यांना ईडीने नोटीस पाठविले असल्याची चर्चा शुक्रवार पासून सुरु होती. नोटीस मिळाल्याची बातमी खरी असल्याचे म्हणत खडसेंनी या वृत्ताला दुजोरा दिला. आता ही नोटीस त्यांना कोणत्या घोटाळ्या प्रकरणी आलेय याची माहिती देखील समोर आली आहे.

भोसरी भूखंड प्रकरणी ईडीने त्यांना ही नोटीस बजवली आहे. याआधीही या प्रकरणी चार वेळा चौकशी झाली असून आता पाचव्यांचा खडसेंची चौकशी होणार असल्याचे समजते. ईडीने खडसेंना पाठविलेल्या नोटीसमध्ये ३० डिसेंबरला हजर राहण्याची आदेश दिले आहेत.

एका भूखंड घोटाळ्यावरून एकनाथ खडसे यांनी सहा वर्षांचा राजकीय वनवास भोगला होता. त्यानंतर आता पून्हा एकदा त्यांना ईडीची नोटीस आली. पून्हा एकदा त्यांचे राजकीय भवितव्य अडचणीत येवू शकते.