Let's overcome corona and build health; Happy New Year to Chief Minister Uddhav Thackeray

संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. महाराष्ट्रतही स्थिती भयंकर आहे. राज्यातील कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेते सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना दिसत आहेत. मात्र, आता भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोना काळातील कामाची दखल घेतली आहे.

    मुंबई : संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. महाराष्ट्रतही स्थिती भयंकर आहे. राज्यातील कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेते सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना दिसत आहेत. मात्र, आता भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोना काळातील कामाची दखल घेतली आहे.

    सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांच भरभरुन कौतुक केले आहे. मुंबईत कोरोना व्हायरस संक्रमणाचा दर कमी केल्याबद्दल उद्धव ठाकरे सरकारला शाबासकी मिळायला हवी. तसेच, मला विश्वास आहे, की आता रुग्णालयेही सज्ज झाली आहेत, असेही स्वामी यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

    दरम्यान, दुसरीकडे राज्यातील भाजप नेते मुख्यमंत्र्यांच्या निर्णयांचा सातत्याने विरोध करतात. लॉकडाऊनला देखील विरोध झाला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १५ मे पर्यंत कडक निर्बंध लावले आहेत.