कुख्यात गुंड रवी पुजारीच्या कोठडीत १५ मार्चपर्यंत वाढ; विशेष मोक्का न्यायालयाचा आदेश

दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणलेल्या कुख्यात गुंड रवी पुजारीला गजाली रेस्टॉरंटमधील गोळीबार प्रकरणी मंगळवारी मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने 15 मार्चपर्यत दिवसांची पोलीस कोठडीत वाढ केली.

    मुंबई (Mumbai).  दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणलेल्या कुख्यात गुंड रवी पुजारीला गजाली रेस्टॉरंटमधील गोळीबार प्रकरणी मंगळवारी मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने 15 मार्चपर्यत दिवसांची पोलीस कोठडीत वाढ केली.

    2016 मध्ये विलेपार्ले येथील हॉटेल गजाली येथे खंडणीसाठी आलेल्या त्याच्या साथीदाराने एका व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने 8 जणांना अटक करून त्यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. प्रकऱणातील मुख्य फरार आरोपी असलेल्या रवी पुजारीला ताब्यात घेण्यासाठी खंडणीविरोधी पथकाने न्यायालयात प्रत्यार्पणचा अर्ज दाखल केला होता. रवी पुजारीला ताब्यात घेण्यात आल्यानंतर विशेष मोक्का न्यायालयाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. हा कालावधी संपत असल्यामुळे मंगळवारी विशेष मोक्का न्यायालयाचे न्या. डी. ई कोथळीकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. पुजारीकडून अद्याप चौकशी सुरू आहे.

    त्याचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू असल्याने कोठडीचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली. मात्र, त्याला पुजारी यांच्यावतीने विरोध करण्यात आला. चौकशी तसेच जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ मिळाला असून अधिक कोठडीची गरज नसल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, आपल्याला काही गोष्टींची तपास अधिकाऱ्यांना सांगायची असल्याचे पुजारी यांनी न्यायालयाचा सांगतिले. त्याची दखल घेत न्यायालयाने 15 मार्चपर्यंत पुजारीच्या पोलिस कोठडीत वाढ केली.