Gangster procession on release from prison; Police sent him back to jail

गजाविरोधात पुण्यातील पोलीस ठाण्यात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे, फूड मॉलवर जबरदस्तीने वस्तू उचलणे, तसेच मोक्का कायद्याअंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले. त्याविरोधात गजा मारणेने उच्च न्यायालयात धाव याचिका दाखल केली आहे.

    मुंबई : तळोजा कारागृहामधून सुटका झाल्यानंतर शक्तिप्रदर्शन करून महामार्गावर धुडगूस घातल्याप्रकऱणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेला कुख्यात गुंड गजा मारणेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे रद्द करण्याची मागणी त्याने याचिकेतून केली असून त्याची दखल घेत न्यायालयाने तातडीने गुरुवारी सुनावणी निश्चित केली आहे.

    पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात 2014 पासून कारागृहात अससेल्या गजा उर्फ गजानन मारणेची सात वर्षांनी आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. गजा कारागृहाबाहेर आल्यानंतर गजाच्या समर्थकांनी त्याची मिरवणूक काढली. तसेच समर्थकांनी पुण्याकडे जाताना महामार्गावर धुडगूस घातला. उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला.

    या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. त्यावर गजाविरोधात पुण्यातील पोलीस ठाण्यात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे, फूड मॉलवर जबरदस्तीने वस्तू उचलणे, तसेच मोक्का कायद्याअंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले. त्याविरोधात गजा मारणेने उच्च न्यायालयात धाव याचिका दाखल केली आहे.

    आपल्या विरोधातील गुन्हे रद्द करण्यात यावेत अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. त्यावर सोमवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, राज्य सरकारच्यावतीने याचिकेला विरोध करण्यात आला. गजाविरोधात पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल कऱण्यात आले असल्याची माहिती त्यांच्यावतीने देण्यात आली. त्याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी गुरुवारी घेण्याचे निश्चित केले.