आता अनिल परबांचा नंबर; सोमय्यांचा राज्यपाल भेटीनंतर इशारा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांवर आरोप करण्यात आले. शिवसेनेचे संजय राठोड आणि राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर असल्याने त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली. तशातच आता भाजपाने ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांविरोधात दंड थोपटले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनिल परब आणि किरीट सोमय्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचसंबंधी शुक्रवारी भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

    मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांवर आरोप करण्यात आले. शिवसेनेचे संजय राठोड आणि राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर असल्याने त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली. तशातच आता भाजपाने ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांविरोधात दंड थोपटले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनिल परब आणि किरीट सोमय्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचसंबंधी शुक्रवारी भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

    किरीट सोमय्या, खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार राम कदम यांचा समावेश असलेल्या भाजपाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास राजभवनात राज्यपाल यांची भेट घेतली. राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी तब्बल 10 कोटींचे साई रिसॉर्ट दापोलीमध्ये उभारले आहे असा आरोप सोमय्या काही दिवसांपासून करत आहेत. त्यामुळे अनिल परब यांच्याविरोधात फसवणूक आणि बेकायदेशीर बांधकाम या दोन गोष्टींसाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली.

    अनिल परब यांनी फसवणूक केली आहे. त्यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे. राजपाल कोश्यारी यांनी आम्हाला या प्रकरणाबाबत आश्वासन दिले आहे. परब यांनी वाळू असलेल्या जागेत रिसोर्ट बांधलाच कसा? तशी परवानगी कोणाकडून मिळाली? या प्रकरणाची विशेष तपास टीमकडून चौकशी केली जावी, अशी मागणी आम्ही केली आहे. - किरीट सोमय्या, भाजपा नेतेअनिल परब यांनी फसवणूक केली आहे. त्यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे. राजपाल कोश्यारी यांनी आम्हाला या प्रकरणाबाबत आश्वासन दिले आहे. परब यांनी वाळू असलेल्या जागेत रिसोर्ट बांधलाच कसा? तशी परवानगी कोणाकडून मिळाली? या प्रकरणाची विशेष तपास टीमकडून चौकशी केली जावी, अशी मागणी आम्ही केली आहे.

    - किरीट सोमय्या, भाजपा नेते