आता BMC करणार दररोज २ हजार किलो कच-यापासून वीज निर्मिती, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रकल्पाचे लोकार्पण

‘स्वराज्यभूमी’ गिरगांव चौपाटी लगत प्रस्तावित ‘दर्शक गॅलरी’चे भूमिपूजन आणि कच-यापासून वीज निर्मिती करणा-या प्रकल्पाचे लोकार्पण आज पर्यावरण मंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले.

    मुंबई – हाजीअली जवळील चौक केशवराव खाड्ये मार्गालगतच्या चौकात पालिकेच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या कच-यापासून वीज निर्मिती करणा-या प्रकल्पाचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामध्ये दररोज २ हजार किलो कच-याचा वापर करुन वीज निर्मिती केली जाणार असून, दररोज सुमारे २५० ते ३०० युनिट इतकी वीज निर्मिती होणार आहे.

    ‘स्वराज्यभूमी’ गिरगांव चौपाटी लगत प्रस्तावित ‘दर्शक गॅलरी’चे भूमिपूजन आणि कच-यापासून वीज निर्मिती करणा-या प्रकल्पाचे लोकार्पण आज पर्यावरण मंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले.

    याप्रसंगी महापौर किशोरी किशोर पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, प्रभाग समिती अध्यक्षा मीनल पटेल, स्थानिक नगरसेविका श्रीमती ज्योत्स्ना मेहता, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त विजय बालमवार आदी उपस्थित होते.

    असा आहे वीज निर्मिती प्रकल्प

    वीज निर्मिती प्रकल्पांतर्गत दररोज २ हजार किलो कच-यापासून प्रथम गॅस निर्मिती करण्यात येईल. या गॅसचा उपयोग करुन जनित्राच्या आधारे वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पातून दररोज साधारणपणे २५० ते ३०० इतके युनिट वीज निर्मिती होईल. सुरुवातीच्या टप्प्यात महापालिकेच्या एका उद्यानात व घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या एका कचरा विलगीकरण केंद्रात या वीजेचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेच्या वीज खर्चात आंशिक बचत होण्यासह कचरा वाहून नेण्याच्या खर्चात देखील बचत करणे शक्य होणार असल्याची माहिती पालिकेने दिली.