महाविकास आघाडीचं सरकार भ्रष्ट; परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर चंद्रकांत पाटलांची टीका

परमबीर सिंग यांनी लेखी पत्राद्वारे म्हटले आहे की वाझेला दर महिन्याला १०० कोटी अनिल देशमुखांना द्यायला लागत होते. वाझेला कलेक्शन करण्यासाठीच पुन्हा घ्यायला लावले हे स्पष्ट झालं आहे. हे सरकार भ्रष्ट आहे. आता संजय राऊत यांनाचं ग्रहमंत्री पद द्या, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

    मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांच पाटील यांनी सरकार टीका केली आहे.

    पाटील म्हणाले की, परमबीर सिंग यांनी लेखी पत्राद्वारे म्हटले आहे की वाझेला दर महिन्याला १०० कोटी अनिल देशमुखांना द्यायला लागत होते. वाझेला कलेक्शन करण्यासाठीच पुन्हा घ्यायला लावले हे स्पष्ट झालं आहे. हे सरकार भ्रष्ट आहे. आता संजय राऊत यांनाच ग्रहमंत्री पद द्या, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

    देशमुखांनी वाझेंना वसुली करण्यास भाग पाडले

    माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये जमा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे.