kangana ranaut to urmila atondkar

उर्मिला ही सॉफ्ट पॉर्न स्टार आहे, अशी टीका कंगनाने केली आहे. उर्मिला तिच्या अभिनयासाठी ओळखली जात नाही, अशी टाकही कंगनाने केली आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) सातत्याने आपल्या विरोधकांवर तिखट शब्दांमध्ये टीका करीत आहे. अभिनेत्री उर्मिला (Urmila) मातोंडकरने कंगनावर केलेल्या टीकेनंतर, उर्मिला ही सॉफ्ट पॉर्न स्टार (Soft porn) आहे, अशी टीका कंगनाने केली आहे. उर्मिला तिच्या अभिनयासाठी ओळखली जात नाही, अशी टाकही कंगनाने केली आहे. ‘मला भाजपातून (BJP) तिकिट हवे आहे, जे माझ्यासाठी फारसे अवघड नाही, यामुळे उर्मिला माझ्यावर टीका करत आहे.

उर्मिलाला जर काँग्रेसमधून तिकिट मिळू शकते तर मला का मिळू शकत नाही‘ असा प्रश्नही कंगनाने उपस्थित केला आहे. जया बच्चन यांच्या समर्थनार्थ बोलताना उर्मिलाने कंगनावर टीका केली होती. कंगनाने बॉलिवूडमधील ड्रग्जचा मुद्दा उपस्थित करण्याआधी स्वताच्या हिमाचल प्रदेशातील ड्रग्ज स्वच्छतेची मोहीम हाती घेण्याची गरज आहे, असे उर्मिलाने म्हटले होते. देशात ड्रग्जची सुरुवात हिमाचल प्रदेशमधून झाल्याचा दावाही उर्मिलाने केला होता. गेल्या वर्षी उर्मिलाने काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली होती, त्यात तिचा पराभव झाला होता. आता कंगनाने तिच्यावर शेलक्या शब्दात टीका केल्यानंतर काँग्रेस नेते उर्मिलाच्या समर्थनार्थ उतरले आहेत.

भाजपाच्या सांगण्यावरुन कंगनाची बेताला बडबड

उर्मिला मातोंडकर हिच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत कंगनाने माफी मागायला हवी, अशी मागणी काँग्रेसे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. उर्मिला मातोंडकरचा महाराष्ट्राला अभिमान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कंगनाला बळ देणाऱ्या भाजपाने राज्यातील १३ कोटी जनतेची माफी मागायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मुंबईतील बॉलिवूडही भाजपाला मुंबई आणि राज्याबाहेर न्यायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

जे कधी मंदिर होते, ते स्मशान केले, ऑफिसवर कारवाईनंतर कंगनाचे दु:ख

बांद्र्यातील ऑफइसवर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईने अजूनही कंगना व्यथित आहे. तोडलेल्या कार्यालयाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत, कंगनाने पुन्हा आपले दु:ख व्यक्त केले आहे. कंगना म्हणते ’हा माझ्या स्वप्नांवर, स्वाभिमानावार आणि माझ्या भविष्यावर केलेला बलात्कार आहे. माझे ऑफिस मंदिरासारखे होते, ते आता स्मशानासारखे करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अनेकांचे रोजगार गेले आहे. एका फिल्म युनिटमधून अनेकांना रोजगार मिळतात, थिएटरमालकांपासून ते पॉपकॉन विकणाऱ्यांपर्यंत अनेकांचे घर चालते. या सगळ्यांचे रोजोगार ज्यांनी हिसकावून घेतले तेच आता राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करत आहेत’ अशी टीका तिने महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.