आता परमबीर सिंग यांच्या मुसक्या आवळणं गरजेचंं; हसन मुश्रीफ संतापले

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीवरुन राज्याच्या राजकारणाचा पारा पुन्हा चढलाय. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी सीबीआयचे उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांच्या चौकशी अहवालाची माहिती देत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

  मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीवरुन राज्याच्या राजकारणाचा पारा पुन्हा चढलाय. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी सीबीआयचे उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांच्या चौकशी अहवालाची माहिती देत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चौकशी अहवालातून दूध का दूध पानी का पानी झालंय, आता खाकी वेषातील दरोडेखोर परमवीर सिंग याच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे, असा हल्लाबोल मुश्रीफ यांनी केला.

  …परमवीर सिंगच जबाबदार

  दुसरीकडे मुश्रीफ यांनी आणखी एक गंभीर आरोप केला. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटाला परमबीर सिंगच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप मुश्रीफ यांनी केला. तर अनिल देशमुख निर्दोष आहेत, पक्षाला बदनाम करण्याच हे भाजपचं कारस्थान आहे असं मी वारंवार सांगत होतो. सीबीआयच्या अहवालाने याचा पर्दाफाश केलाय, असं मुश्रीफ म्हणाले. तसंच चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करून देशमुख यांच्यावर अन्याय केला, असा आरोपही त्यांनी केला.

  मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?

  सीबीआयच्या प्राथमिक अहवालात आमचे नेते अनिल देशमुख यांना क्लिनचिट दिल्याची माहिती कळते आहे. यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप बिनबुडाचे होते, हे सिद्ध झालंय. दूध का दूध पानी का पानी झालं, आता खाकी वेषातील दरोडेखोर परमबीर सिंग याच्या मुसक्या आवळणंं गरजेचं आहे, असा आक्रमक पवित्रा मुश्रीफ यांनी घेतला.

  नवाब मलिक काय म्हणाले?

  यांना क्लिन चीट देण्यात आल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी थेट सीबीआयला सवाल केला आहे. देशमुखांबाबत माध्यमातून आलेल्या बातम्यांमध्ये सत्य काय आणि असत्य काय याचा खुलासा सीबीआयने तात्काळ करावा. ही सीबीआयची जबाबदारी आहे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.