Now you will know the price of petrol in your city with one click, you have to do this work nrsj

एसएमएसद्वारे आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत देखील आपल्याला माहिती अशू शकते. इंडियन ऑयल आयओसीने दिलेल्या सुविधेअंतर्गत तुम्हाला एसएमएसवर पेट्रोल आणि डिझेलची किंमत मिळते.

मुंबई : आता वाहनचालकांना कुठेही कधीही आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत कळणार आहे. त्यामुळे वाहनचालकांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत कमी-जास्त होत असते. त्यामुळे देशातील इंधनाच्या दरात वाढ होत असते. परंतु आपल्या मोबाईलवर एसएमएसद्वारे ही पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेता येणार आहे.

एसएमएसद्वारे आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत देखील आपल्याला माहिती अशू शकते. इंडियन ऑयल आयओसीने दिलेल्या सुविधेअंतर्गत तुम्हाला एसएमएसवर पेट्रोल आणि डिझेलची किंमत मिळते. आपल्या मोबाईलमध्ये आरएसपी तसेच आपला स्थानिक शहराचा कोड लिहायचा आहे. आणि हा मेसेज ९२२४९९२२४९ या नंबरवर पाठवायचा आहे.

यानंतर आपल्याला त्वरित आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर मोबाईलवर दिसतील. प्रत्येक शहरातील दर बघण्यासाठी त्या शहराच्या कोडचा वापर करावा लागेल. तसेच आपण आयओसी हा मोबाईल ॲपही वापरु शकता. दररोज सकाळी ६ वाजता इंधनाच्या किंमती बदलत असतात. सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. हेच दर दुसऱ्या दिवसांपर्यत लागू राहतात. पेट्रोलचे मुंबईत प्रति लिटर ९०.३४ रुपये आहे. तर डिझेलचे दर प्रतिलिटर फक्त ८०.५१ आहे.