५६०० कोटींचा NSEL घोटाळा; गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे हायकोर्टाचे आदेश

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमध्ये (एनएसईएल) ५६०० कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याची बाब 2013 मध्ये समोर आली होती. यात जवळपास ६४४५ गुंतवणूकदारांचे २ ते १० लाख रुपये अडकले आहेत.

    मुंबई :  सुमारे ५६०० कोटी रुपयांच्या नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल) घोटाळा प्रकरणी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीत कोर्टाने ज्या गुंतवणूकदारांचे २ ते १०  लाख रुपये घोटाळ्यात अडकले आहेत अशा गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे आदेश दिले. यामुळे हजारो गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

    देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमध्ये (एनएसईएल) ५६०० कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याची बाब 2013 मध्ये समोर आली होती.

    यात जवळपास ६४४५ गुंतवणूकदारांचे २ ते १० लाख रुपये अडकले आहेत. यावर आज हायकोर्टाचे न्यायाधीश एस. एस. शिंदे आणि न्यायाधीश मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणाऱ्या विशेष कायद्यानुसार खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला.