धारावीत कोरोना बाधितांचा आकडा १८९ वर

मुंबई :  धारावीत कोरोना विषाणूचा झपाट्याने फैलाव होत असून धारावीत गेल्या २४ तासांत ९ नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.

 मुंबई :  धारावीत कोरोना विषाणूचा झपाट्याने फैलाव होत असून धारावीत गेल्या २४ तासांत ९ नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.   त्यामुळे धारावीतील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या १८९ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती जी नार्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.   

धारावीत गेल्या २४ तासांत ९ नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.  धारावीच्या मुस्लिम नगर , माटुंगा लेबर कॅम्प ,  इंदिरा नगर , लक्ष्मी चाळ , जनता सोसायटी , सर्वोदय सोसायटी , सोशल नगर, मुकुंद नगर, सोशल नगर, कुट्टीवाडी, टाका मस्जिद  या परिसरात आतापर्यंत कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले असल्याने धारावीतील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या १८९ वर पोहोचली आहे.  तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे.  
दादर व माहीम येथे आज प्रत्येकी एक रुग्ण आढळले 
धारावीनंतर माहीम, दादर परिसरात कोरोना रुग्ण रोज आढळत असून आज दादर येथील आगर बाजार येथे ५५ वषीय पुरुष कोरोना पाॅझिटीव्ह आढळल्याने दादर मधील कोरोना रुग्णांची संख्या २७ वर पोहोचली आहे. तर माहीम येथील स्वामी विवेकानंद उद्यानाजशळील सागर दर्शन येथे ७० वषीर्य पुरूष कोरोना पाॅझिटीव्ह आढळल्याने माहीम येथील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या १८ वर पोहोचली आहे.