ओ परिवार मंत्री…शपथ काय घेता,शेंबूड पुसा आणि राजीनामा द्या; नितेश राणेंची बोचरी टिका

आ.नितेश राणे यांनी ट्विट करत मंत्री अनिल परब यांच्यावर बोचरी टिका करत राजीनामा देण्याची मागणी केली आहे.”ओ परिवार मंत्री..शपथ काय घेता..शेंबूड पुसा..राजीनामा दया आणि चौकशी ला सामोरे जा..पुरावे तयार आहेत..आता वस्त्रहरण अटळ आहे!!”,अशा शब्दांत नितेश राणे यांनी अनिल परब यांची खिल्ली उडवली आहे.

    मुंबई : परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझेंच्या या आरोपांना आता स्वत: अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं होतं. यावरुन भाजप नते नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

    दरम्यांन आ.नितेश राणे यांनी ट्विट करत मंत्री अनिल परब यांच्यावर बोचरी टिका करत राजीनामा देण्याची मागणी केली आहे.”ओ परिवार मंत्री..शपथ काय घेता..शेंबूड पुसा..राजीनामा दया आणि चौकशी ला सामोरे जा..पुरावे तयार आहेत..आता वस्त्रहरण अटळ आहे!!”,अशा शब्दांत नितेश राणे यांनी अनिल परब यांची खिल्ली उडवली आहे.

    परब पत्रकार परिषदेत काय म्हणाले ?

    परब म्हणाले की,“दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवसांपासून आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून माहिती होतं, असं अनिल परब म्हणाले.