Devendraji, I will go to Kolhapur again ... Chandrakant Patil's big announcement

देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, देशाच्या इतिसात पहिल्यांदा एवढे ओबीसी मंत्री बनवणारे कोण असतील? ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आपण म्हणायचो बहुजनांचे राज्य येणार, ते आज मोदींचे मंत्रिमंडळ पाहिल्यावर कळते ओबीसींचा खरा पक्ष कोणता? तर तो भाजप आहे. ओबीसींना संवैधानिक दर्जा मिळवून देण्याचे काम भाजपने केले आहे. आज केंद्र सरकराच्या माध्यमातून ओबीसी समाजासाठी खूप योजना सुरु झाल्या आहेत. ओबीसी समाजाला स्थान देण्यासाठी महामंडळासाठी निधी दिला. सर्व समाजाला पुढे घेऊन जात नाही तोपर्यंत आपण देशाला पुढे घेऊन जाऊ शकत नाही, हे आमच्या पक्षाचे ब्रीद वाक्य आहे. मात्र ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा खूप गंभीर झाला आहे असे ते म्हणाले.

  मुंबई : महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींना आरक्षण मिळू शकत नाही, तर हा सरकारचा डाव आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या कार्यकारणीच्या बैठकीत ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

  ओबीसींचा खरा पक्ष भाजपच

  देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, देशाच्या इतिसात पहिल्यांदा एवढे ओबीसी मंत्री बनवणारे कोण असतील? ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आपण म्हणायचो बहुजनांचे राज्य येणार, ते आज मोदींचे मंत्रिमंडळ पाहिल्यावर कळते ओबीसींचा खरा पक्ष कोणता? तर तो भाजप आहे. ओबीसींना संवैधानिक दर्जा मिळवून देण्याचे काम भाजपने केले आहे. आज केंद्र सरकराच्या माध्यमातून ओबीसी समाजासाठी खूप योजना सुरु झाल्या आहेत. ओबीसी समाजाला स्थान देण्यासाठी महामंडळासाठी निधी दिला. सर्व समाजाला पुढे घेऊन जात नाही तोपर्यंत आपण देशाला पुढे घेऊन जाऊ शकत नाही, हे आमच्या पक्षाचे ब्रीद वाक्य आहे. मात्र ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा खूप गंभीर झाला आहे असे ते म्हणाले.

  ओबीसीच्या प्रश्नांवर १२ आमदारही निलंबीत

  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यानी देखील ओबीसींच्या आरक्षणाचा लढा सुरू राहणार असून भाजप जनजागृती अभियान करणार आहे. ते म्हणाले की छगन भुजबळ, आणि विजय वडेट्टीवार यांनी समाजाची दिशाभूल केल्याचे दिसत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे धाडस भाजपने केले मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला नाही असे ते म्हणाले. ओबीसीच्या प्रश्नांवर आशिष शेलार यांच्या सारखे १२ आमदारही निलंबीत झाले मात्र भाजपने त्याची पर्वा केली नाही हे सामान्य माणसाला समजावून सांगणे गरजेचे आहे. भाजपने ओबीसींच्या जागा रद्द झाल्या तरी ओबीसीना उमेदवारी देण्याचे नियोजन केले आहा असे ते म्हणाले. ओबीसीच्या प्रश्नांवर भाजपचे फडणवीस आणि मी स्वत:ला अटक करवून घेतली कारण हा आमचा समाज आहे असे पाटील म्हणाले.

  भाजपचा ही स्वबळाचा नारा

  एकट्याच्या ताकदीवर शिवसेनेला सोबत न घेता सत्ता आणायची असेल तर १७ सप्टेंबरच्या मोदी यांच्या वाढदिवसांपासून दोन कोटी सक्रीय कार्यकर्ते जोडण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. मागील काळात शिवसेनेचे नेते रोज सकाळी भांडत होते. त्यामुळे आता मध्यप्रदेश गुजरात प्रमाणे महाराष्ट्रातही भाजप स्वबळावर सत्तेत येईल असे ते म्हणाले.