महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुखमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुखमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : मराठा समाजाच्या विविध संघटना आणि नेत्यांसोबत सरकारची चर्चा सुरू आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर वकिलांशीही चर्चा सुरू आहे. यासोबतच ओबीसी समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्या समाजाच्या नेत्यांशीही सरकारची चर्चा सुरू आहे. पण, विरोधकांनी राज्यातील सामाजित सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये. महाराष्ट्रातील एकजूट आणि त्याला तडा जाईल असे काही करू नये. ओबीसीला समाजाला कारण नसताना डिवचण्याचे काम करू नये असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

विरोधी पक्षाने पत्रकार परीषद घेत ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली. त्यावर मुंख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी पत्रकार परीषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला जोरदार प्रत्त्युत्तर दिले.

गेले वर्षभर विरोधक सरकार पधी पडतेय आणि सरकार कधी पडणार याचा मुहूर्त काढण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे सरकारने काय काय कामे केली आहेत ते त्यांनी पाहिलेले नाही. जनतेमध्ये सरकारबद्दल कुठलीही नाराजी किंवा असमाधान नाही. राज्यातील जनतेत सरकारबद्दल नाराजी नाही. पण विरोधकांना राज्यात अघोषित आणीबाणी वाटत असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आपल्या मागण्यासांठी आंदोलन करत आहेत. या शेतकर्‍यांशी नीट बोलणे, त्यांच्या मागण्या जाणून घेणे हे तर सोडाच ऐन थंडीत त्यांच्या पाण्याचे फवारे मारले जात आहेत. हे सद्भावनेचे लक्षण नाही, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या पक्षात कोण हवेत कोण नकोत, यासाठी ते प्रवीण दरेकरांना ताब्यात घेण्यासाठी सरकारला सुचवत आहेत का? असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अजित पवार यांनीही यावेळी लगावला. प्रवीण दरेकरांना ताब्यात घेणार असे सरकारमधून कुणीही म्हटलेले नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान, चिनी की अतिरेकी आहेत हे भाजप नेत्यांनी ठरवावे. पण आपल्या देशातील अन्नदात्याला देशद्रोही किंवा अतिरेकी ठरवणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. कामगार, शेतकर्‍यांच्या न्याय हक्काबाबत कोणी बोलले तर ते देशद्रोही. विरोधात बोलले आणि तुरुंगात टाकणे ही आणीबाणी नाही का? पाकिस्तानमधून कांदा आणणारे तुम्हीच. आता पाकिस्तानमधून शेतकरी आणताहेत का ? की आपल्या शेतकर्‍यांना पाकिस्तान ठरवतात. आपला शेतकरी न्यायासाठी लढला तर तो देशद्रोही. बाहेर कांदा आणि साखर आयात करून त्याच्यावर अन्याय का केला जातोय ? असे सवाल त्यांनी केले.

आपल्या न्याय हक्कासाठी लढणे आणि कृषी कायद्याआडून आणि कामगार कायद्याआडून ही गळचेपी सुरू आहे. कामगार, शेतकर्‍यांसह इतरांच्या न्यायहक्कांबद्दल कुणी बोलले तर तो देशद्रोही? जर विरोधात बोलले आणि तुरुंगात टाकणे ही आणीबाणी असेल तर न्यायहक्कासाठी लढणार्‍या देशद्रोही ठरवणे हे आणीबाणी पेक्षाही जास्त पातक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कृषी कायद्यांबद्दल इथं बोलण्यापेक्षा दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना कृषी कायदा किती त्यांच्या हिताचा ते जाऊन सांगावे. घरगुती कामगारांप्रमाणे केंद्र सरकार सरकारी संस्थांचा वापर करतेय. हे सर्व खेळ जनता पाहते आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

विधान परिषदेच्या १२ जागा या राज्यपाल नियुक्त असतात. या जागा नियुक्त करण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे. पण, त्या नियुक्तीचा कालावधी ठरवला जावा. ही नियुक्ती किती काळ रखडावी ? अधिकार मर्जीनुसार वापरता येतो का? मर्जी आणि अधिकार यातला फरक समजून घेतला पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लक्ष्य केले.