Obesity treatment devices made by KEM Hospital; Performance of Dr. Hemant Deshmukh and Dr. Krantikumar Rathod

एप्रिल २०१६ पासून केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख व डॉ. क्रांतिकुमार राठोड यांनी रक्तवाहिन्यांच्या आजारांवर संशोधन सुरू केले. संशोधना दरम्यान त्यांची संकल्पना अंमलात आणण्यासाठी त्यांनी एक मेडिकल डिवाईस तयार केले. या मेडीकल डिवाईसचा वापर करून रक्त वाहिन्यांतून रक्ताचा प्रवाह कमी केल्यास लठ्ठपणा कसा कमी करता येईल, याबद्दलचे संकल्पित नमूने अमेरिकेच्या पेटंट ऑफिसला सादर केले होते.

    मुंबई: सेठ गो. सु. वै. महाविद्यालय व केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता व रेडिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. हेमंत देशमुख आणि इंटर्वेशनल रेडिओलॉजीचे डॉ. क्रांतिकुमार राठोड यांनी रक्त वाहिन्यांतून रक्ताचा प्रवाह कमी केल्यास लठ्ठपणा कसा कमी करता येईल, यावर संशोधन करून विशेष मेडिकल डिवाईस बनवले आहे. यासंदर्भातील संकल्पित नमूने अमेरिकेच्या पेटंट ऑफिसला सादर केले असून, त्यांनी ही संकल्पना पूर्ण जगात एकमेव असल्याची ग्वाही दिली. याबद्दल डॉ. हेमंत देशमुख व डॉ. क्रातिकुमार राठोड यांचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी खास अभिनंदन केले.

    एप्रिल २०१६ पासून केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख व डॉ. क्रांतिकुमार राठोड यांनी रक्तवाहिन्यांच्या आजारांवर संशोधन सुरू केले. संशोधना दरम्यान त्यांची संकल्पना अंमलात आणण्यासाठी त्यांनी एक मेडिकल डिवाईस तयार केले. या मेडीकल डिवाईसचा वापर करून रक्त वाहिन्यांतून रक्ताचा प्रवाह कमी केल्यास लठ्ठपणा कसा कमी करता येईल, याबद्दलचे संकल्पित नमूने अमेरिकेच्या पेटंट ऑफिसला सादर केले होते.

    दरम्यान,पाच वर्षांच्या अविरत संकल्पनेनंतर अमेरिकेन पेटंट ऑफिसने बौद्धिक संपत्ती यांची संकल्पना पूर्ण जगात एकमेव असल्याची ग्वाही दिली. स्थूलपणाचे उपचार या मेडिकल डिवाईसद्वारे सुरळीत कशाप्रकारे करायचे, याच्यावर पुढील संशोधन चालू राहील. हे पेटंट मिळाल्याबद्दल महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या वतीने डॉक्टर हेमंत देशमुख यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी, उपमहापौर सुहास वाडकर, आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, स्थापत्य समिती अध्यक्ष दत्ता पोंगडे, शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ, सिंधु मसुरकर, उर्मिला पांचाळ आदी उपस्थित होते.