Offensive mention of Raksha Khadse on BJP's website

रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. याचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. भाजपाच्या अधिकृत वेबासाईटवर रक्षा खडसे यांची चुकीची ओळख करुन देण्यात आली आहे. त्यांच्या नावाखाली वादग्रस्त शब्दांमध्ये त्यांचे वर्णन करण्यात आले आहे.

मुंबई : रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
भाजपाच्या अधिकृत वेबासाईटवर रक्षा खडसे यांची चुकीची ओळख करुन देण्यात आली आहे. त्यांच्या नावाखाली वादग्रस्त शब्दांमध्ये त्यांचे वर्णन करण्यात आले आहे.

भाजपाच्या अधिकृत वेबसाईटवर पक्षाच्या देशभरातील खासदारांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये खासदाराचे नाव, फोटो आणि मतदारसंघाचा उल्लेख आहे. मात्र, रक्षा खडसे यांच्या मतदारसंघाचा म्हणजेच रावेरचा उल्लेख करण्याऐवजी या वेबसाईटवर ‘होमोसेक्शुअल’ असं लिहिण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.

याचा स्क्रीनशॉट देखील सर्वत्र व्हायरल झाला आहे. या व्हायरल स्क्रीनशॉर्टनंतर रक्षा खडसे यांच्या फोटोखालील हा उल्लेख काढून तेथे मतदारसंघाचं नाव टाकून चूक सुधारण्यात आली आहे.

रावेरचं हिंदीमधील गुगल ट्रान्सलेशन चुकीच्या पद्धतीने करण्यात झाल्यानं हा गोंधळ झाल्याची सारवासारव करण्याक आली आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप भाजापाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली आहे. देशमुख यांनी ट्विट करत कडक कारवाईचा इशारा दिला आहे.