देवेंद्र फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; पाच जणांविरोधात नाशिकमध्ये तक्रार दाखल

देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक रूग्णालयातील दौ-यात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले नाही म्हणून कमेंट करणाऱ्या काही जणांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

    मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक रूग्णालयातील दौ-यात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले नाही म्हणून कमेंट करणाऱ्या काही जणांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

    या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या बिटको हॉस्पिटलमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना परिस्थिती बाबत आढावा घेतला होता.

    दौऱ्यात विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरही त्यांच्यासोबत होते. त्यावेळी काही जणांनी फडणवीसांविषयी आक्षेपार्ह भाषेत हेटाळणी केली होती. माजी मुख्यमंत्र्यांचे सोशल डिस्टन्सिंग बघा असे म्हणत फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह शेरेबाजी या व्हिडीओमध्ये करण्यात आली होती.