जुहू समुद्र किनाऱ्यावर आढळले तेलकट टारबॉल; माशांसह इतर जलचरांना धोका

मुंबईतील जुहू समुद्रात मोठ्या प्रमाणात जहाजातून मालवाहतूक केली जाते. सातत्याने अशी वाहतूक झाल्याने ऑईल गळती होत असते. या तेलाचे चिकट गडद रंगाचे टारबॉल तयार होतात.

    मुंबई : जुहू समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात तेलकट असलेले टारबॉल आढळले आहेत. मालवाहू जहाजातून ऑईल गळती होऊन त्याचे टारबॉल तयार होत असून ते मासे व तत्सम जलचरांना धोका निर्माण करतात. कच्च्य़ा तेलामुळे तयार होणारे टारबॉल हे गडद रंगाचे चिकट गोळे असून ते भरतीनंतर समुद्र किनाऱ्यावर फेकले जात आहेत. जुहू समुद्र किनाऱ्यावर मागील चार वर्षापासून तेलकट टारबॉल आढळत असून, त्याचे प्रमाण वाढत असल्याने याबाबत चिंता व्यक्त केली जाते आहे.

    मुंबईतील जुहू समुद्रात मोठ्या प्रमाणात जहाजातून मालवाहतूक केली जाते. सातत्याने अशी वाहतूक झाल्याने ऑईल गळती होत असते. या तेलाचे चिकट गडद रंगाचे टारबॉल तयार होतात. या टारब़ॉल समुद्राचे पाणी प्रदूषित करीत असल्याने समुद्रातील मासे तशाप्रकारच्या जलचर प्राण्याना धोका पोहचवतात.

    समुद्राला भरती येते तेव्हा तयार झालेले हे टारबॉल समुद्र किना-यावर फेकले जात आहेत. मुंबई महापालिकेकडून हे टारबॉ़ल तात्काळ उचलण्यात आले आहे. भरतीच्यावेळी संबंधित सफाई कंत्राटदाराला सतर्क राहण्याचे आदेशही प्रशासनाने दिले असल्याचे पालिका अधिका-याने सांगितले. दरम्यान मागील चार वर्षापासून तेलकट टारबॉल आढळत असून ते धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.