अरे देवा! परिस्थिती गंभीर, सरकार खंबीर? राज्यात कोरोनाचा हल्लाबोल; दिवसभरात ३६९०२ नव्या रुग्णांची नोंद, मृत्यूदर पोहोचला २.०४ टक्क्यांवर

मृतांचा आकडासुद्धा शंभरी पार गेला असून आज दिवसभरात कोरोनामुळे ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दगावलेल्या रुग्णांमुळे राज्याचा कोरोना मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही ताजी आकडेवारी पाहता, कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढली तर आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

    मुंबई : राज्यात कोरोनाने हाहा:कार उडवला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहे. राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले असले तरी, कोरोना संसर्ग आटोक्यात आणणे शक्य झालेले नाही. या पार्श्वभूमीवर आजसुद्धा कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आज दिवसभरात कोरोनाचे तब्बल ३६,९०२ नवे रुग्ण आढळले आहेत.

    मृतांचा आकडासुद्धा शंभरी पार गेला असून आज दिवसभरात कोरोनामुळे ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दगावलेल्या रुग्णांमुळे राज्याचा कोरोना मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही ताजी आकडेवारी पाहता, कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढली तर आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

    कोरोना रुग्णांची आजची स्थिती

    राज्यात आज दिवसभरात ३६,९०२ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर एकूण १७,०१९ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजची आकडेवारी मिळून राज्यात आतापर्यंत २३,०००,५६ रुग्ण कोरोनातून नुक्त झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८७.२ टक्क्यांवर आले आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे एकूण ११२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर सध्या २.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३६,३७,७३५ वर पोहोचला आहे.

    मुंबई महापालिकेत आज ५५१५ नवे रुग्ण

    मुंबई महापालिकेत आज दिवसभरात कोरोनाचे ५५१५ नवे रुग्ण आढळले. आद दिवसभरात एकूण १० जण दगावल्याची नोंद करण्यात आली. आजच्या १० रुग्णांच्या मृत्यूमुळे आज मुंबई मनपा परिसरात मृतांचा आकडा ११६३३ वर पोहोचला आहे. मुंबई मनपा परिसरातील रुग्णांची संख्या ३,८५,६६१ वर पोहोचली आहे.