मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक; पश्चिम रेल्वे वासियांना दिलासा, क्लिक करा आणि जाणून घ्या वेळापत्रक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३६ या दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविल्या जातील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप स्थानकांवर थांबतील.

  मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरी भागात दोन्ही मार्गांवर आज देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  माटुंगा-मुलुंड अप व डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० दरम्यान

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३६ या दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविल्या जातील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड स्थानकापासून धीम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.

  ठाणे येथून सकाळी १०.२७ ते दुपारी ३.५५ पर्यंत अप धीम्या मार्गावरुन सुटणाऱ्या उपनगरी गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार असून भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येईल.

  हार्बर मार्ग

  कुर्ला- वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० दरम्यान

  सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणारी वाशी / बेलापूर / पनवेल करिता डाऊन हार्बर मार्गावरील सेवा व पनवेल/ बेलापूर / वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि पनवेल – वाशी विभागांदरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

  हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ४.३० या वेळेत मेन लाइन आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  पश्चिम मार्ग

  आज पश्चिम रेल्वे मार्गावर कोणाताही ब्लॉग घेण्यात येणार नाही.

  on central railway both routes western railway route have no mega block today