पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची जाचातून सुटका, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक; प्रवास करण्याआधी जाणून घ्या सविस्तर

देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन मार्गावर भायखळा-माटुंगा अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ वाजल्यापासून संध्याकाळी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

  मुंबई : देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

  मेन मार्ग

  भायखळा-माटुंगा अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ वाजल्यापासून संध्याकाळी ४.०५ वाजेपर्यंत

  सकाळी १०.४९ वाजल्यापासून ३.४८ वाजेपर्यंत छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा भायखळा आणि माटुंगा दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील ज्या आपल्या गंतव्यस्थानी थांबतील आणि त्यानंतर पुढे माटुंगा येथे डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १५ मिनिटे उशिराने पोहोचतील

  सकाळी ११.०६ वाजल्यापासून दुपारी ३.५७ वाजेपर्यंत कुर्ला येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गांवरील सेवा माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील, ज्या त्यांच्या नियोजित ठिकाणी थांबतील आणि पुढे भायखळा येथे अप जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि आपल्या निर्धारित वेळेनुसार १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

  हार्बर मार्ग

  छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० वाजल्यापासून संध्याकाळी ४.४० वाजेपर्यंत आणि
  चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० वाजल्यापासून संध्याकाळी ४.१० वाजेपर्यंत

  सकाळी ११.३४ वाजल्यापासून संध्याकाळी ४.४७ वाजेपर्यंत छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडहून वाशी/बेलापूर/पनवेल करिता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी ०९.५६ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.४३ वाजेपर्यंत छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून वांद्रे/गोरेगाव साठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येतील.

  सकाळी ९.५३ वाजल्यापासून दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी येथून सुटणाऱ्या सेवा छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करिता अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.४५ वाजल्यापासून संध्याकाळी ४.५८ वाजेपर्यंत गोरेगाव/वांद्रे येथून सुटणाऱ्या लोकल छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करिता अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करणयात येतील.

  तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म नंबर ८) दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.

  हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉग कालावधीत सकाळी १०.०० वाजल्यापासून संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  पश्चिम मार्ग

  पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.

  on central railway line both routes and western railway route have no mega block today