राज्य सरकाने दिलेला पदभार न स्वीकारता प्रवीण परदेशी केंद्रात प्रतिनियुक्तीवर

दिल्लीतील नव्या पदावर रुजू होण्यासाठी आदेश प्राप्त होताच, परदेशी यांनी काही तासातच दिल्ली गाठली. त्यांची ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे. दिल्लीतील कामकाजानिमित्ताने परदेसी यांना पंतप्रधानांच्या सल्लागाराच्या भूमिकेतही काम करावे लागेल. नॅशनल कपॅसिटी ब्लिडंग कमिशनतर्फे प्राईम मिनिस्टर्स पब्लिक रिसोर्स काऊन्सिलला मदत केली जाते. विविध सरकारी विभागांतील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण आणि कामकाजात सुधारणे संदर्भात या कौन्सीलचे महत्त्वाचे काम चालते.

  मुंबई : राज्याचे पोलिस महासंचालकपद सोडून सुबोध जयस्वाल हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर निघून गेल्याची घटना ताजी असतानाच राज्य सरकारचे एक ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांनीही तोच मार्ग गुरुवारी अनुसरला. राज्य सरकाने त्यांची नियुक्ती बुधवारी अतिरिक्त मुख्य सचिव मराठी भाषा विभाग या पदावर केली होती. पण त्या पदाचा कार्यभार न स्वीकारता परदेशी हे केंद्र सरकारच्या नॅशनल कपॅसिटी बिल्डींग कमिशन येथे प्रशासकीय सदस्य म्हणून प्रतिनियुक्तीवर निघून गेले आहेत.

  दिल्लीतील नव्या पदावर रुजू होण्यासाठी आदेश प्राप्त होताच, परदेशी यांनी काही तासातच दिल्ली गाठली. त्यांची ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे.
  दिल्लीतील कामकाजानिमित्ताने परदेसी यांना पंतप्रधानांच्या सल्लागाराच्या भूमिकेतही काम करावे लागेल. नॅशनल कपॅसिटी ब्लिडंग कमिशनतर्फे प्राईम मिनिस्टर्स पब्लिक रिसोर्स काऊन्सिलला मदत केली जाते. विविध सरकारी विभागांतील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण आणि कामकाजात सुधारणे संदर्भात या कौन्सीलचे महत्त्वाचे काम चालते.

  परदेशी हे राज्य सरकारमधील एक दक्ष आणि कामात हुषार अधिकारी म्हणून ख्यात आहेत. गतवर्षी मे महिन्यात मुंबई मनपाचे आयुक्त म्हणून त्यांची कारकिर्द अचानक संपुष्टात आल्या नंतर ते राज्य सरकारवर आणि विशेषतः तत्कालीन मुख्य सचिव अजोय मेहतांवर नाराज झाले होते. आयुक्तपदावरून झालेली हकालपट्टी सहन न झाल्याने ते राज्य सरकारच्या सेवेतून पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र संघाच्या सेवेत गेले. त्यांनी 2001 नंतर काही वर्षे संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास परिषदेत (युएनडीपी) विविध पदांवर काम केले होते.

  मुख्य सचिवनियुक्तीत डावलले

  मे 2020 मध्ये युएनडीपीत गेल्यानंतर फेब्रुवारीत 2021 मध्ये ते पुन्हा राज्य सरकारच्या सेवेत आले. कारण मुख्य सचिवपदाच्या शर्यतीत त्यांचेही नाव होते. पण ती संधी त्यांच्या ऐवजी त्यांच्याच बॅचचे दुसरे अधिकारी सीताराम कुंटे यांना मिळाली. म्हणून परदेशी पुन्हा जिनेव्हातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या पदी रुजू झाले. आता दिल्लीतील नियुक्तीसाठी त्यांना मुंबईत येऊन राज्य सरकारच्या सेवेत हजर होणे गरजेचे होते. कारण परदेशातील नियुक्तीवर असताना त्यांना दिल्लीतील पद मिळू शकत नव्हते. त्यामुळे ते मुंबईत आले आणि त्यांनी काही तासच राज्य शासनाच्या अतिरिक्त मुख्य सचीव पदाचे कामकाज केले. गुरुवारी सायंकाळीच आपल्या आधीच्या पदाचा कार्यभार प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्याकडे सुपूर्द करून परदेशी दिल्लीकडे रवाना झाले.

  संकटकाळात चांगली कामगिरी

  प्रवीण परदेशी यांनी अनेकदा संकट काळात चांगली कमगिरी बजावली आहे. लातूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी किल्लारी भुंकपात मदत व पुनर्वसनाचे मोठे कम केले होते. पण मुंबई मनपा आयुक्त असताना त्यांना कोरोना व्यवस्थापन जमत नसल्याचे राज्य सरकाचे मत बनले आणि परदेशींना तातडीने मंत्रालयात बदली देण्यात आली. ते 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.