७२ व्या वर्धापन दिनी एसटीला मिळाली मालवाहतुकीच्या रूपाने नवसंजीवनी

मुंबई : १ जून १९४८ला पुणे-अहमदनगर मार्गावर आपली पहिली एसटी धावली. १ जूनला एसटीचा ७२ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने गेली अनेक वर्षे सातत्याने तोटा सहन करणाऱ्या एसटीला

 मुंबई : १ जून १९४८ला पुणे-अहमदनगर मार्गावर  आपली पहिली एसटी धावली.  १ जूनला एसटीचा ७२ वा वर्धापन दिन  आहे. त्यानिमित्ताने गेली अनेक वर्षे सातत्याने तोटा सहन करणाऱ्या एसटीला मालवाहतुकीच्या रूपाने नवसंजीवनी मिळाली आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष  अॅड. अनिल परब यांनी केली.

ते पुढे म्हणाले  की,  शासनाने १८ मे रोजी काढलेल्या आद्यादेशानुसार एसटी महामंडळ आपल्या बसेसमधून  व्यावसायिक स्वरूपात माल वाहतूक करू शकते, त्यासाठी आवश्यकता असल्यास जुन्या एसटी  बसेसमध्ये  आवश्यक ते बदल करून त्यांचे रूपांतर मालवाहू  वाहनांत  करून त्याद्वारे हि मालवाहतूक करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सध्या एसटीकडे स्वतःची  ३०० मालवाहू वाहने उपलब्ध आहेत. त्याद्वारे मालवाहतूक सुरु करण्यात आली असून त्याचा शुभारंभ रत्नागिरी येथून आंब्यांच्या पेट्या बोरिवलीला पाठवून झाला.

एसटी महामंडळाचे राज्यात २५० आगार आहेत. जवळ जवळ प्रत्येक तालुकास्तरावर हे आगार कार्यरत आहेत. याबरोबर ३१ विभागीय कार्यालये,३३ विभागीय कार्यशाळा असा, मोठा विस्तार भविष्यात एसटीच्या मालवाहतुकीला पाठबळ देणारा आहे.

सध्या प्रत्येक जिल्हास्तरावर एसटीने मालवाहतुकीचे स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून त्यांच्या मार्फत एम. आय. डी. सी. , कारखानदार, लघुद्योजक,कृषिजन्य व्यापारी यांच्या भेटी-गाठी घेऊन एसटीच्या मालवाहतुकीबाबत माहिती दिली जात आहे. यामध्ये शासनाचे अनेक महामंडळे, व्यापार मंडळे आपला माल एसटीच्या मालवाहतुकी मधून पाठविण्यास उत्सुक आहेत.

गेली ६ दिवसात राज्यभरात ४१ ट्रक साठी मालवाहतुकिचे बुकिंग प्राप्त झाले असून, पुणे, नाशिक,सातारा, सांगली, जळगांव व गडचिरोली या जिल्ह्यांनी मालवाहतुकीच्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. माफक दर, सुरक्षित व नियमित सेवेमुळे एसटीच्या मालवाहतुकीला भविष्यात चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. शेखर चन्ने यांनी व्यक्त केली आहे. – जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ